#Durgotsav2018 : लाखोंचा व्यवसाय सोडून महिलांच्या जटामुक्तीसाठी राबणाऱ्या नंदिनी जाधव

#Durgotsav2018 : लाखोंचा व्यवसाय सोडून महिलांच्या जटामुक्तीसाठी राबणाऱ्या नंदिनी जाधव

महाराष्ट्र अंद्धश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये गेल्या 6 वर्षांपासून त्या सक्रिय काम करतात. अतिशय कष्टातून बी.ए.पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर MSW करताना त्यांना सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली.

  • Share this:

( नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर करणारा उत्सव. नवरात्रोत्सव म्हणजे नव्या विचारांचं जागरण. नवरात्रोत्सव म्हणजे मांगल्याची सुरूवात. अशा या पवित्र पर्वावर आम्ही तुम्हाला करून देणार आहोत महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान महिलांच्या कार्याची ओळख. 'Durgotsav 2018' मधून. या महिलांनी सर्व आव्हानांवर मात करत, संघर्ष करत समाजाला प्रेरणा दिली.)

पुणे : महाराष्ट्र अंद्धश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये गेल्या 6 वर्षांपासून त्या सक्रिय काम करतात. अतिशय कष्टातून बी.ए.पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर MSW करताना त्यांना सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली. MSW करत असताना त्यांना बर्‍याच ठिकाणी फिल्ड वर्कसाठी विविध संस्थामध्ये काम करण्याची संधी मिळाली.

आणि त्याचं काम सुरू झालं. रेड लाईट एरिया मधल्या सेक्स वर्कर्संना त्यांनी ज्वेलरी मेंकींगचं प्रशिक्षण दिलं. अंध,अपंग,अनाथ आश्रम मधील मुलींसाठी त्यांनी हस्तकलेचं प्रशिक्षण देणारं शिबिरं घेतलं. 150 प्रकारचे विविध प्रशिक्षण घेऊन त्यात वेळोवेळी नवीन गोष्टींची भर घातली.

लंडन येथील ब्यूटी पार्लरचा एक वर्षाचा कोर्स त्यांनी पुर्ण केला. स्वतःची "गोल्डन ग्लोरी" संस्था स्थापन केली. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

दाभोलकरांच्या खुनानंतर स्वतःचे अद्यावत ब्यूटी पार्लर त्यांनी बंद केले. दर महिन्याला त्यांना लाख रूपये मिळायचे पण पैश्यांपेक्षा प्रबोधन जास्त महत्वाचे वाटले. त्यामुळं पार्लर बंद करून अंनिसमध्ये पुर्ण वेळ काम करण्याचा निर्णय घेतला.

अंनिस मध्ये काम करताना ब्युटी पार्लरच्या अनुभवाचा उपयोग जट सोडवण्यासाठी केला. महिलांच्या डोक्यात असणारी जट काढण्यात महिला अंधश्रद्धेमुळं तयार नसत. पण त्यांना दोन दोन वर्षे  प्रबोधन करून त्यांच्या मनातील भिती दुर करून आता पर्यत 43 महीलांच्या डोक्यात असणारी जट सोडविल्या. 40 बुआबाबांचा भांडाफोड करून त्यांना पोलिसांच्या हवाली करत मोठं काम उभं केलं.

 

First published: October 13, 2018, 7:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading