Home /News /news /

VIDEO : विजयाची हवा,शिवसेनेच्या विजयी उमेदवारावर उधळल्या नोटा

VIDEO : विजयाची हवा,शिवसेनेच्या विजयी उमेदवारावर उधळल्या नोटा

काँगेसचे बहुमत असलेल्या हिमायतनगर नगर पंचायतीच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी विजयी मिरवणुकीत पैश्याची उधळण केल्याचा प्रकार समोर आलाय.

    मुजीब शेख,नांदेड, 24 जुलै :  काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या गडात शिवसेनेनं मुसंडी मारत हिमायतनगर नगरपंचायतीवर भगवा फडकवला खरा पण करून दाखवलं म्हणणाऱ्या शिवसैनिकांनी विजयी उमेदवारावर नोटा उधळवून असंही ओंगाळवाणं रूप दाखवलंय.काँगेसचे बहुमत असलेल्या  हिमायतनगर  नगर पंचायतीच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी विजयी मिरवणुकीत पैश्याची उधळण केल्याचा प्रकार समोर आलाय. हिमायतनगर नगरपरिषदेच्या नगरअध्यक्षपदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ झाल्यानंतर मंगळवारी पुन्हा निवडणूक झाली. एकूण 17 सदस्यापैकी 10 सदस्य काँगेसचे आहेत. चार सदस्य असलेल्या शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या तीन बंडखोरांच्या मदतीने अध्यक्ष पदाची निवडणूक तीन मतांनी जिंकली.  निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नगर पंचायती बाहेर कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. विजयी उमेदवार बाहेर येताच एका कार्यकर्त्याने पैश्याची उधळण सुरू केली. नगर पंचायत कार्यालयासमोरच विजेत्यांनी पैसे उडवून उन्माद केला. त्यानंतर काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीत देखील नोटा उधळन्यात आल्या. काँग्रेसचे नगराध्यक्ष अब्दुल अखिल यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने या पदासाठी निवडणूक झाली होती. काँग्रेसने पुन्हा अब्दुल अखिल यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसचा एक गट नाराज झाला होतो आणि या नाराज गटातील तिघांनी शिवसेनेशी हातमिळवणी केली. काँगेसचे बंडखोर जावेद गणी यांची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागली आहे. पक्षीय बलाबल एकूण - 17 काँग्रेस - 10 शिवसेना - 4 राष्ट्रवादी - 2 अपक्ष - 1
    First published:

    Tags: Ashok chavan, Nanaded, Shivsena, अशोक चव्हाण, काँग्रेस, नांदेड, राष्ट्रवादी, शिवसेना, हिमायतनगर, हिमायतनगर नगरपंचायत

    पुढील बातम्या