नांदेड्च्या सरकारी हॉस्पिटलची दुर्दशा, स्ट्रेचर नसल्यानं रूग्णाला चादरीवर न्यावं लागलं ओढत

नांदेड्च्या सरकारी हॉस्पिटलची दुर्दशा, स्ट्रेचर नसल्यानं रूग्णाला चादरीवर न्यावं लागलं ओढत

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात रुग्णाचीं हेळसांड होत असल्याचा एक व्हिडिओ सोशियल मीडियावर व्हायरल झालाय. पायाला प्लॅस्टर असलेल्या एका महिलेला दोन नातेवाईक महिला चादरीवर बसवून ओढत नेतानाचा हा व्हिडीओ आहे.

  • Share this:

मुजीब शेख,नांदेड,ता.26 जून :  नांदेडच्या शासकीय रुग्णालयात रुग्णाचीं हेळसांड होत असल्याचा एक व्हिडिओ सोशियल मीडियावर व्हायरल झालाय. पायाला प्लॅस्टर असलेल्या एका महिलेला दोन नातेवाईक महिला चादरीवर बसवून ओढत नेतानाचा हा व्हिडीओ आहे.

रुग्णालयात स्ट्रेचर नसल्याने या महिलेला तिच्या नातेवाईकांनी अश्या पद्धतीने एका चादरीवर बसवून फरफटत नेले. पाय फॅक्चर झाल्याने ही महिला नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात आली होती. त्या महिलेच्या पायाला प्लास्टर करण्यात आले नंतर तिला सुट्टी देण्यात आली.

पण रुग्णालयातुन बाहेरच्या गेट पर्यत नेण्यासाठी स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने महिलेच्या सोबत असलेल्या नातेवाइकांनी एका चादरीवर त्या रूग्णाला बसवून ओढत नेले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमली.

स्ट्रेचर उपलबद्ध होण्यासाठी थोडा वेळ लागत होता, त्यासाठी त्या रुग्ण महिलेला थांबवण्यात आले होते. पण कुणालाच काहीही न सांगता तिच्या नातेवाईकांनी तिला अशा पद्धतीने ओढत नेल्याचे स्पष्टीकरण रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आलं आहे.

नांदेडचं हे हॉस्पिटल मराडवाड्यातलं 570 खाटाचं सर्वात मोठं हॉस्पिटल आहे. काही वर्षांपूर्वी गुरूदा गद्दी कार्यक्रमांतर्गत नांदेडला काही हजार कोटी रूपये मिळाले होते. त्यातून या हॉस्पिटलचाही कायापालय झाल्याचं सांगितलं जाते.

मात्र साध स्ट्रेचर उपलब्ध होत असल्यानं या शासकीय हॉस्पिटलच्या प्रशासनाविषयीच शंका निर्माण झाली आहे.

हेही वाचा...

 आणीबाणी हा देशाच्या लोकशाहीच्या सुवर्णपानावर लागलेला एक कलंक- मोदी

 आणीबाणीवरून राजकारण तापलं ! देशात ४ वर्षांपासून अघोषित आणीबाणी, मनसेची टीका

 भाजपच्या नगरसेवकाची आळंदीत भरदिवसा हत्या

 निवडणुकीचा फंड गोळा करण्यासाठी प्लास्टिक बंदी - राज ठाकरे

 महाराष्ट्र बँक बंद करण्याचा सरकारचा डाव - राज ठाकरे

First published: June 26, 2018, 8:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading