मुंबई, 15 फेब्रुवारी : नाणारबाबत शिवसेनेची भूमिका बदलली आहे का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण नाणारला विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या मुखपत्रातच नाणारची जाहिरात देण्यात आली आहे. मात्र, इतर वृत्तपत्रांप्रमाणेच हेसुद्धा वृत्तपत्र असल्याचं सांगत खासदार विनायक राऊत यांनी टोलवाटोलवी केली आहे.
वृत्तपत्रात नाणार रिफायनरी प्रकल्पाची जाहीरात छापून आल्याप्रकरणी खासदार विनायक राउत यांनी खुलासा केला आहे. सामना हे शिवसेनेचं जरी मुखपत्र असलं तरी हे वृत्तपत्र असल्याचं म्हणत वृत्तपत्रांमध्ये इतर जाहिराती येतात तशीच ती जाहिरात आली असेल असं स्पष्टीकरण विनायक राऊतांनी दिलं आहे. सामनाच्या या जाहिरातीमुळे कोकणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
याविषयी बोलताना राऊत पुढे म्हणाले की, 'कंपनी अशा जाहिराती देत असली तरी ते स्वत:च्या मनात मांडे खात असतील. पण सरकारने हा प्रकल्प केव्हाच गुंडाळलेला आहे. जोपर्यंत स्थानिक जनता हा प्रकल्प हवा आहे म्हणून म्हणत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकल्पाबाबत कोणताही विचार करणार नाहीत' असं खासदार राऊत यावेळी म्हणाले.
नाणारच्या जाहिरातीवर भाजपची प्रतिक्रिया
देर आऐ दुरुस्त आऐ! सामनातून नाणारसाठी अशा जाहिराती प्रसिद्धा करण्यात येत असतील तर आम्हाला त्याचा आनंद आहे. अखेर त्यांना बेरोजगारीचा प्रश्न दिसला आणि त्यांनी या प्रकल्पाची उभारणी केली तर आम्ही यात त्यांचं स्वागत करू. शिवसेनेला उशिरा का होऊन सुबुद्धी आल्याची प्रतिक्रिया रिफायनरी प्रकल्प समर्थक आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिली आहे.
इतर बातम्या - राज ठाकरे म्हणाले पक्षातच आहे गद्दार, 2 दिवसांत नावं समोर आणून करणार हकालपट्टी
ठाकरे सरकारने नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधातल्या आंदोलकांचे गुन्हे घेतले मागे
नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधातल्या आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. या प्रकरणात दाखल झालेले गुन्हे आता मागे घेण्यात आल्याने कोकणातल्या आंदोलकांना दिलासा मिळाला आहे. कोकणात हा प्रकल्प होऊ नये यासाठी शिवसेनेनेही आंदोलनात उडी घेतली होती. त्यानंतर हा प्रकल्प रायगडला हलविण्यात येणार असल्याची घोषणाही तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या प्रकल्पामुळे पर्यावरणाला हानी पोहोचू शकते असं वाटल्याने स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता.
इतर बातम्या - लेकाला अग्नी देणाऱ्या बापाने दिली होती ठार मारण्याची सुपारी!
नाणार पुन्हा येणार?
नाणार रिफायनरी ही नाणारलाच झाली पाहिजे असं आमचं मत होतं मात्र इथं झालेल्या विरोधामुळे तो निर्णय थांबवावा लागला. आता लोकांची इच्छा असल्यास त्यावर पुन्हा चर्चा करण्यास तयार असल्याचं भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. फडणवीसांचं हे वक्तव्य शिवसेनेला राजकीय उत्तर असल्याचं त्यावेळी बोललं गेलं. नाणार ही ग्रीन रिफायनरी आहे. ही झाली असती तर इथल्या 1 लाख लोकांना रोजगार मिळाला असता. विकास झाला असता. मात्र विरोधामुळे हा निर्णय थांबवावा लागला. आज मी कुठली घोषणा करत नाही. मात्र इथल्या लोकांना पुन्हा एकदा चर्चेला बोलावतो असं आश्वासन फडणवीसांनी दिलं होतं.
इतर बातम्या - घरातलं लग्न ठरलं शेवटचं! वऱ्हाडी बसची कंटेनरला भीषण धडक, 4 जणांचा जागीच मृत्यू
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Congress, Maharashtra, Nanar refinary project, Sharad pawar, Shivsena