पंतप्रधान मोदींचं 'ओबीसी' जात प्रमाणपत्र गुजरातमध्ये जाऊन तपासणार- नाना पटोले

पंतप्रधान मोदींचं 'ओबीसी' जात प्रमाणपत्र गुजरातमध्ये जाऊन तपासणार- नाना पटोले

भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देताच नाना पटोलेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ओबीसी असण्याबाबतच शंका उपस्थित केलीय. ''पंतप्रधान मोदींनी शेतकरी प्रश्नावर आणि ओबीसीच्या मुद्दयांवर माझ्या सोबत वाद घातला होता, त्यामुळे ते खरंच मागास जातीचे आहे का, याची मी गुजरातमध्ये जाऊन शहानिशा करणार आहे एवढंच नाहीतर त्यांचे जात प्रमाणपत्रही मी तपासणार आहे, असं नाना पटोलेंनी म्हटलंय.

  • Share this:

09 डिसेंबर, नागपूर : भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देताच नाना पटोलेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ओबीसी असण्याबाबतच शंका उपस्थित केलीय. ''पंतप्रधान मोदींनी शेतकरी प्रश्नावर आणि ओबीसीच्या मुद्दयांवर माझ्या सोबत वाद घातला होता, त्यामुळे ते खरंच मागास जातीचे आहे का, याची मी गुजरातमध्ये जाऊन शहानिशा करणार आहे एवढंच नाहीतर त्यांचे जात प्रमाणपत्रही मी तपासणार आहे, असं नाना पटोलेंनी म्हटलंय.

''भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिल्याने, मी पापाच्या व्यवस्थेपासून मोकळा झालो आहे. मी आता त्यांच्या पापाचे भांडे फोडणार आहे, मोदींनी गुजरात निवडणुकीत मागास जातीचा मुद्दा पुढे केल्यानेच मी राजीमाम्यासाठीही जाणिवपूर्वक कालचा दिवस निवडलाय. मी अद्याप कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही पण ११ तारखेला राहुल गांधींसोबत गुजरातच्या प्रचारसभेत नक्कीच सहभागी होणार आहे.'' असंही नाना पटोलेंनी म्हटलंय.

पंतप्रधानांच्या दबावामुळेच वेगळ्या विदर्भाचे बील संसदेत येऊ शकले नाही, असंही पटोलेंनी म्हटलंय. दानवे आपली खूर्ची वाचवण्यासाठी माझ्या राजीनाम्यावर बोलत असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय. केंद्रात पंतप्रधान मोदींच्या एककल्ली कार्यपद्धतीविरोधात आवाज उठवून, थेट राजीनामा देणारे नाना पटोले हे भाजपचे पहिले खासदार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2017 01:07 PM IST

ताज्या बातम्या