सध्या जो सरकारविरोधात बोलतोय, त्याला मारून टाकाल का ? - नाना पटोले

सध्या जो सरकारविरोधात बोलतोय, त्याला मारून टाकाल का ? - नाना पटोले

''सध्या जो सरकारविरोधात बोलतोय, त्याला मारून टाकाल का ?'' असा थेट सवाल करत खासदार नाना पटोले यांनी मोदी सरकारवर पुन्हा दडपशाहीचे गंभीर आरोप केलेत. तर मुगाबेही पायउतार होऊ शकतात तर इतरांची काय कथा ? असं सांगत यशवंत सिन्हांनी मोदी सरकारच्या हुकूमशाहीवर पुन्हा कोरडे ओढलेत.

  • Share this:

23 नोव्हेंबर, पुणे : ''सध्या जो सरकारविरोधात बोलतोय, त्याला मारून टाकाल का ?'' असा थेट सवाल करत खासदार नाना पटोले यांनी मोदी सरकारवर पुन्हा दडपशाहीचे गंभीर आरोप केलेत. भाजपचे बंडखोर खासदार नाना पटोले यांनी आज पुण्यात बोलताना सोहराबुद्धीन एनकाऊंटर केसमधील जस्टीस लोया यांच्या गुढ मृत्यू प्रकरणाला स्पर्श करत मोदी-शहा यांच्या कार्यकाळात सुरू असलेल्या राजकीय दडपशाहीवर जोरदार हल्लाबोल चढवलाय. जस्टीस लोया यांचं नेमकं काय झालं ? असा खडा सवालच त्यांनी मोदी सरकारला विचारलाय. मोदी-शहांच्या कार्यकाळात भाजपमध्ये कुणालाच बोलू दिलं जात नसल्याचं सांगत त्यांनी लोकशाही राजकारणातही दडपशाही फार काळ चालणार नाही, असाही इशारा दिलाय.

राज्यातील फडणवीस सरकार आणि राष्ट्रवादीच्या राजकीय मैत्रीवर भाष्य करताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांच्या त्या दिलदार शूत्र विधानाचा उल्लेख करत महाराष्ट्रात फक्त एकच भूजबळ आहेत का ? असा थेट सवाल केला. केंद्र आणि राज्यातलं सरकार हे हुकूमशाही पद्धतीने राज्यकारभार करत असल्याचा गंभीर आरोपही नाना पटोले यांनी केलाय.

मुगाबे पायउतार होऊ शकतात तर इतरांची काय कथा ?- यशवंत सिन्हा

पुण्यातील याच व्याख्यानमालेत मोदी सरकारचे आणखी एक पक्षांतर्गंत विरोधक आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचंही भाषण झालं. यशवंत सिन्हा यांनीही अर्थव्यवस्थेवर थेट भाष्य करत नोटबंदीच्या निर्णयावर पुन्हा टीकास्त्रं सोडलं. तसंच मोदींच्या हुकूमशाही पद्धतीवर कोरडे ओढले.

यशवंत सिन्हा म्हणाले, '' झिम्बॉम्बेत सलग तीन दशकं सत्ता उपभोगलेले मुगाबे यांनाही पायउतार व्हावं लागलंय तर इथे इतरांची काय कथा ? '' असे खडे सुनावत पंतप्रधान मोदींना पुन्हा वास्तवाची जाणिव करून दिली. तसंच जिथे कुठे सरकार चुकीचं वागेल त्याविरोधात मी यापुढेही बोलणारच कारण भारतातली लोकशाही वाचलीच पाहिजे, असंही यशवंत सिन्हा म्हटलंय. मला कुठलं पद हवंय म्हणून सरकारविरोधात बोलत नाहीतर लोकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठीच सरकारच्या दडपशाहीविरोधात आवाज उठवतोय. असा निर्वाळाही यशवंत सिन्हा यांनी दिलाय.

First published: November 23, 2017, 10:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading