फेरीवाल्यांची काहीही चूक नाही- नाना पाटेकर

फेरीवाल्यांची काहीही चूक नाही- नाना पाटेकर

फेरीवाल्यांच्या प्रश्नावर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी प्रथमच भाष्य केलंय. फेरीवाल्यांची काहीच चूक नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

  • Share this:

मुंबई, 04 नोव्हेंबर : फेरीवाल्यांच्या प्रश्नावर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी प्रथमच भाष्य केलंय. फेरीवाल्यांची काहीच चूक नसल्याचं त्यांनी म्हटलंय. माटुंग्याच्या व्हीजेटीआय कॉलेजच्या टेक्नोवन्झा फेस्टिव्हलमध्ये ते बोलत होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांविरोधात सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाना पाटेकरांचं हे विधान अतिशय महत्वाचं मानलं जातंय.

नाना पाटेकर म्हणाले, ''मला काल कोणीतरी विचारलं की फेरीवाल्यांच्या प्रश्नावर तुमचं काय म्हणणं आहे. त्यावर माझं एवढंच म्हणणं आहे की, याच त्या गरीब बिचाऱ्या फेरीवाल्यांची काहीही चूक नाही, प्रत्येकाला पोट भरण्याचा अधिकार आहे, चूक असेल तर तुमची आमची आहे, ते बिचारे आपले पोटाच्या भाकरीसाठी धंदा करतात, आपण कॉर्पोरेशनला का नाही विचारलं इतके दिवस ? कार्पोरेशननंही इतक्या वर्षात का नाही केलं डिमार्केशन ?'' असा उलट सवालच नाना पाटेकरांनी फेरीवाल्यांच्या मुद्यावर प्रशासनाला उपस्थित केलाय.

फेरीवाल्यांच्या प्रश्नावर नाना पाटेकरांच्या भूमिकेवर आता राज ठाकरे नेमकी प्रतिक्रिया देतात हे पाहणं लागणार आहे.

First published: November 4, 2017, 1:04 PM IST

ताज्या बातम्या