राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची नावं निश्चित, गृह आणि गृहनिर्माण खात्यावर सस्पेन्स कायम

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची नावं निश्चित, गृह आणि गृहनिर्माण खात्यावर सस्पेन्स कायम

  • Share this:

मुंबई, 29 डिसेंबर : मंत्रिमंडळ विस्तारावर सिल्व्हर ओकवरील राष्ट्रवादीची बैठक संपली आहे. या बैठकीमध्ये आमच्या शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची नावं निश्चित झाली असल्याची माहिती  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. या यादीवर घटकपक्षाचं सहकार्य लाभेल असं म्हणत पुढच्या काही वेळात एनसीपीच्या मंत्र्यांची यादी मुख्यमंत्र्यांकडे पाठवली जाणार असल्याचं जयंत पाटील म्हणाले आहेत. उद्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सिल्व्हर ओकवर बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये अजित पवार,  प्रफुल्ल पटेल आणि एनसीपीचे इतर नेते उपस्थित होते.

दरम्यान, गृहनिर्माण आणि गृहखात्यावरून अद्याप सस्पेन्स कायम आहे. मुख्यमंत्री योग्य प्रकारे खातेवाटप करतील तर आमची खाती आमच्याकडेच राहतील असंही जयंत पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे यावरून खात्यांमध्ये अदलाबदल होणार असल्याचं स्पष्ट आहे. विधिमंडळाच्या प्रांगणात सोमवारी दुपारी 12 वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे एकूण 36 मंत्री शपथ घेतील, अशी माहिती आहे.

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे 13 तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी 12 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शपथविधीसाठी राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांना स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून फोन केले जात आहेत. उद्या मंत्रिपदाची शपथ घ्यावी, असा निरोप शरद पवार फोन करून राष्ट्रवादीच्या नेत्यांना निरोप देत असल्याची माहिती आहे.

एकीकडे सेनेच्या निश्चित मंत्र्यांची यादी अजूनही गुलदस्त्यात आहे. कारण आज रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिकला जाणार आहेत. सोमवारी सकाळी नाशिक पोलिसांच्या कार्यक्रमात उपस्थित राहून ते लगेच मुंबईत परतणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचे कोण-कोण मंत्री शपथ घेणार या संदर्भात सोमवारी सकाळीच अधिकृतपणे कळवलं जाणार असल्याचं दिसतं. राज्य शिष्टाचार विभागालाही मंत्री म्हणून कोण शपथ घेणार याची यादी अगदी शेवटच्या क्षणीच मिळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरातांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीत संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातील यादीवर चर्चा झाल्याची माहिती थोरातांनी दिली. सोमवारी दुपारी 12 वाजता विधानभवनाच्या प्रांगणात राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी काही प्रमाणात पूर्ण झाली आहे. 2 हजार पेक्षा जास्त पोलीस बंदोबस्त तर साडेचार हजार आसन क्षमता प्रांगणात करण्यात आली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत 28 नोव्हेंबरला सहा कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली होती. यामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांचा समावेश होता. त्यानंतर महिनाभर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू होती. राज्याच्या मंत्रिमंडळात जास्ती जास्त 43 मंत्री शपथ घेऊ शकतात. आता मुख्यमंत्र्यांसह 7 जणांनी शपथ घेतल्यानं आणखी 36 जण शपथ घेऊ शकतात.

मंत्रिमंडळ विस्तारात कोणाची वर्णी लागणार, कोणाला कोणतं खातं मिळणार याची अधिकृत माहिती अद्याप कोणीही दिलेली नाही. मात्र, सध्या काही नेत्यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराआधी खातेवाटपावरूनही आघाडीत बरीच चर्चा झाली आहे. त्यात गृह खाते शिवसेनेकडून राष्ट्रवादीला देण्याची चर्चाही होत आहे.

महाविकास आघाडीतील संभाव्य मंत्र्यांची नावे

शिवसेना

गुलाबराव पाटील, जळगाव

अब्दुल सत्तार, सिल्लोड

दादा भुसे, मनमाड

संजय रायमूलकर, बुलडाणा

बच्चू कडू (प्रहार), अमरावती

राहुल पाटील, परभणी

प्रदीप जयस्वाल, औरंगाबाद

श्रीनिवास वनगा, पालघर

रवींद्र वायकर/ सुनील राऊत, मुंबई

तानाजी सावंत, उस्मानाबाद

शंभूराज देसाई, सातारा

भास्कर जाधव, कोकण

दीपक केसरकर, तळ कोकण

प्रकाश अबीटकर, कोल्हापूर

आशिष जयस्वाल, नागपूर

संजय राठोड, यवतमाळ

राष्ट्रवादी काँग्रेस

अजित पवार, बारामती

अनिल गोटे, जळगाव

धर्मराव बाबा आत्राम, विदर्भ

राजेश टोपे, जालना

नवाब मलिक , मुंबई

संग्राम जगताप, अहमदनगर

हसन मुश्रीफ, कोल्हापूर

अनिल देशमुख, नागपूर

इंद्रनिल नाईक, यवतमाळ

राजू शेट्टी/जयंत पाटील(शेकाप) कोल्हापूर / अलिबाग

काँग्रेस

के सी पाढवी, उत्तर महाराष्ट्र

अमित झनक, मालेगाव

यशोमती ठाकूर, विदर्भ

अशोक चव्हाण, मराठवाडा

अमीन पटेल, मुंबई

अमित देशमुख, लातूर

प्रणिती शिंदे, सोलपूर

सतेज पाटील, कोल्हापूर

विश्वजीत कदम, सांगली

जोगेंद्र कवाडे (मित्रपक्ष) मुंबई

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 29, 2019 07:17 PM IST

ताज्या बातम्या