आसामध्ये एनआरसीच्या यादीतून 1.40 कोटी लोकं गायब

आसामध्ये एनआरसीच्या यादीतून 1.40 कोटी लोकं गायब

नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन या पहिल्या यादीत जवळपास दोन कोटी लोकांना वैध घोषित करण्यात आलंय. मात्र या यादीतून सुमारे 1.40 कोटी लोकांची नावं गायब असल्यानं आसाममधील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

  • Share this:

01 जानेवारी :  सरत्या वर्षाला निरोप देतानाच आसाम सरकारने राज्यातील अधिकृत नागरिकांची यादी जाहीर केली आहे. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन या पहिल्या यादीत जवळपास दोन कोटी लोकांना वैध घोषित करण्यात आलंय. मात्र या यादीतून सुमारे 1.40 कोटी लोकांची नावं गायब असल्यानं आसाममधील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

त्यातच सोशल मीडियामध्ये यासंदर्भात वेगवेगळ्या अफवाही पसरत आहेत . आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर बांग्लादेशी रहात असल्याने या बांग्लादेशींची यादी तयार करणार असल्याचं आश्वासन भाजपनं दिलं होतं. त्यानुसार ही यादी तयार करण्यात आली आहे. या दृष्टीने आसाममध्ये 'नॅशनल रजिस्टर सिटीझन'ला (एनआरसी) महत्त्व प्राप्त झालंय.

१९५१ च्या जनगणनेनुसार हा मसुदा तयार करण्यात आलाय. यामुळे बांगलादेशी घुसखोरांना शोधणे शक्य होणार आहे. या यादीनुसार ३.२९ कोटी अर्जदारांपैकी १.९ कोटी लोकांना अधिकृत भारतीय नागरिकाचा दर्जा देण्यात आला. 'ज्यांचे नाव पहिल्या यादीत नाही, त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. ही अत्यंत कठीण आणि किचकट प्रक्रिया होती. त्यामुळे पहिल्या यादीत काही लोकांना स्थान मिळू शकले नसेल, पण यामुळे घाबरण्याचे कारण नाही,' असे राज्यातील एनआरसीचे समन्वयक प्रतीक हजेला यांनी सांगितले. एनआरसी मसुद्यातील दुसरी यादी कधी जाहीर होणार ? असा प्रश्न विचारला असता 'हे सर्व काम सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली सुरु आहे. ही संपूर्ण प्रक्रिया २०१८ मध्ये पूर्ण होणार आहे,' असं ते म्हणाले.

First published: January 1, 2018, 5:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading