नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण : आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण : आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

वैभव राऊत आणि शरद कळस्कर त्याचप्रमाणे पुण्यातून अटक करण्यात आलेल्या सुधन्वा गोंधळेकरला 28 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

  • Share this:

मुंबई, 18 ऑगस्ट : नालासोपारामधून अटक करण्यात आलेल्या वैभव राऊत आणि शरद कळस्कर त्याचप्रमाणे पुण्यातून अटक करण्यात आलेल्या सुधन्वा गोंधळेकरला 28 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता असल्यामुळे या आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

नालासोपारामधल्या स्फोटकं जप्त प्रकरणी एटीएसनं अटक केलेल्या वैभव राऊतला या हिंदुत्ववादी सनातनी कार्यकर्त्याला त्याच्या दोन साथीदारांसह 10 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. घातपाताचा मोठा कट उधळल्यानंतर मुंबई एटीएसनं वैभव राऊतसह त्याचा साथीदार शरद कळस्कर याला आणि दुसरा मुख्य साथीदार सुधन्वा गोंधळेकर याला पुण्यातून अटक केली होती. महत्वाचे धागे दोरे हाती लागतील यासाठी तिघांनाही 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ती आज संपल्याने न्यायालयाने तिघांच्याही पोलीस कोठडीत २८ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे.

नालासोपाऱ्यातल्या भांडार अळीत राहणाऱ्या वैभव राऊतच्या घरी छापा मारून 20 बॉम्ब आणि 2 जिलेटीन कांड्या अशी स्फोटकं मुंबई एटीएसनं जप्त केली होती. सरकारी वकिलांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर आणि नालासोपाऱ्यात मोठे घातपात घडवण्याचा त्यांचा कट होता.

या प्रकरणात एटीएसने आपली कारवाई अधिक तीव्र करत राज्यभरातून आणखी १२ जणांना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून एक-एक धक्कादायक माहिती समोर येत असल्यामुळे वैभव राऊत आणि शरद कळस्कर आणि सुधन्वा गोंधळेकरच्या पोलीस कोठडीत 28 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी न्यूज18 लोकमतला दिली.

एटीएसला ११ ऑगस्ट रोजी सुधन्वा गोंधळेकरच्या पुण्यातल्या घरातून बॉम्ब बनवण्याची पुस्तके सापडली होती. त्यानंतर सोमवार 13 ऑगस्ट रोजी त्याच्या घरातून संदिग्ध साहित्य जप्त करण्यात आलं. ज्यात सुधन्वाचा लॅपटॉप, मोबाईल, पेनड्राईव्ह, डोंगलसह त्याची मोटरसायक जप्त करण्यात आली. सुधन्वाच्या लॅपटॉप, मोबाईल आणि पेनड्राईव्हमध्ये काय दडलंय याचा शोध एटीएस घेत असून, त्यात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नालासोपारा स्फोटक प्रकरणामुळे उलगडला दाभोळकरांच्या हत्येचा कट

रेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. नरेंद्र दाभोळकरांवर गोळी झाडणा-याला सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. यात सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे नालासोपारा स्फोटक प्रकरणातील आरोपीनेच दाभोळकरांच्या हत्येचा कट रचला होता. तब्बल 5 वर्षांनंतर दाभोळकर हत्या प्रकरणात दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींपैकी एकाचा थेट दाभोळकर हत्या प्रकरणात सहभाग आहे. त्यामुळे आता या प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

दाभोळकरांची हत्या करण्यामागे आणि नालासोपारा स्फोटक प्रकरणात आमचा हात असल्याची कबूली आरोपींनी तपासा दरम्यान दिली आहे. वैभव राऊतटीम मधील एकाने अशी कबूली दिली आहे. नालासोपारा स्फोटक प्ररकणाचा तपास करत असलेल्या एटीएसने अशी माहिती सीबीआयला दिली आणि त्यावरून या मोठा शोध लावण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस आता याचा वेगळ्या पद्धतीने शोध घेत आहे.

नरेंद्र दाभोळकरांवर गोळी झाडणा-याला सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. सचिन अंधुरे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. औरंगाबादमधून सचिन अंधुरेला सीबीआयने ताब्यात घेतलं आहे. तब्बल 5 वर्षानंतर दाभोळकर प्रकरणात दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

डॉ.नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रे़ड गोविंद पानसरे यांच्या हत्येला पाच वर्ष पूर्ण होत आहेत आणि आता कुठे त्यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यात सीबीआयला यश आलं आहे. दरम्यान, सीबीआय आता आरोपीची कसून चौकशी करत आहेत. त्यामुळे यात आणखी कोणाचा हात आहे का आणि कोणाच्या या सांगण्यावरून हे सगळं करण्यात आलं आता याचाही लवकरच उलघडा होईल का याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

नरेंद्र दाभोलकरांनी राज्यभर फिरून अंधश्रद्धाविरोधात जनजागृती केली. त्यांच्या या कार्याचं केंद्र होतं पुणे. पुण्यातून निघणार्‍या साधना साप्ताहिकाच्या माध्यमातून त्यांनी ही चळवळ राबवली. दुदैर्व म्हणजे याच पुण्यात त्यांचा खून झाला.

डॉ.नरेंद्र दाभोलकर शनिवार पेठेत बालंगधर्व रंगमदिराकडून ओंकारेश्वर मंदिराकडे जाणार्‍या पुलावरून जात होते. तेव्हा सात वाजून 20 मिनिटांच्या सुमाराला अचानक 25 ते 30 वर्षं वयाचे दोन तरूण काळ्या स्प्लेंडरवरून आले. त्यांनी बाईक लावली आणि दाभोलकरांवर पाठीमागून चार गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या दाभोलकरांच्या डोक्यात शिरल्या आणि ते खाली कोसळले. त्याच क्षणी दोघंही हल्लेखोर बाईकवर बसून परागंदा झाले.

 

First published: August 18, 2018, 9:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading