Elec-widget

धक्कादायक! पतीचे वार पत्नीने अंगावर झेलले पण दिराने पुसलं कुंकू

धक्कादायक! पतीचे वार पत्नीने अंगावर झेलले पण दिराने पुसलं कुंकू

भावाच्या नात्याला काळीमा फासणारा हा प्रकार आहे. मुलांमध्ये झालेल्या शुल्लक वादामुळे सख्या भावाने लहान भावाची हत्या केली आहे.

  • Share this:

नालंदा (बिहार), 21 सप्टेंबर : गेल्या काही दिवसांमध्ये गुन्ह्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. असाच एक गंभीर प्रकार समोर आला आहे. लहान मुलांवरून भावा-भावांमध्ये वाद झाला आणि यात एकाची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भावाच्या नात्याला काळीमा फासणारा हा प्रकार आहे. मुलांमध्ये झालेल्या शुल्लक वादामुळे सख्या भावाने लहान भावाची हत्या केली आहे. काठीने मारून मारून भावाला संपवण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

सिकंदर यादव असं मृत भावाचं नाव आहे. तर निरंजन असं आरोपी भावाचं नाव आहे. जेव्हा निरंजन भाऊ सिंकदरला बेदम मारहाण करत होता तेव्हा त्याची पत्नी दारो देवीमध्ये पडली. तिने पतीवरचे सगळे वार स्वत:वर घेतले. यात त्यांचा लहान मुलगाही मधे आला पण त्यांनाही आरोपीने मारहाण केली. यामध्ये पती आणि मुलगा जखमी झाले असल्याची माहिती आहे. यामध्ये पत्नीने पतीला वाचवण्याचे अनेक प्रयत्न केले पण त्यात पतीचा मृत्यू झाला.

मुलांच्या भांडणामुळे वाद सुरू झाला

या घटनेबद्दल माहिती देताना कुटुंबीय म्हणाले की, सिकंदर यादवचा मुलगा आणि त्याचा धाकटा भाऊ निरंजन यांचा 5 दिवसांपूर्वी किरकोळ गोष्टीवरून वाद झाला होता. त्यानंतर गुरुवार वाद सोडवण्यात आला होता. पण निरंजनने राग मनात ठेऊन भावाचा खून केला. या प्रकारामुळे संपूर्ण कुटुंबात शोककळा पसरली आहे. तर पत्नी आणि मुलगा पित्याविना पोरके झाले आहेत.

इतर बातम्या - परप्रांतीय विवाहितेचा खून... नवरा बेपत्ता, घराला बाहेरून लावले होते कुलूप

Loading...

मृताची पत्नी आणि मुलालाही मारहाण करण्यात आली...

शुक्रवारी सकाळी निरंजनने त्याच्या मित्रांसह मोठ्या भावाच्या घरी त्याच्यावर लाठीने मारहाण केले. नवऱ्याला मारहाण झाल्याचं पाहून पत्नी आणि तिचा मुलगा वाचवण्यासाठी गेले. तेव्हा त्यांनाही मारहाण करुन आरोपीने जखमी केलं.

पोलिसांकडून तपास सुरू....

या सगळ्या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून सिंकदरचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला तर जखमी पत्नी आणि मुलालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या सगळ्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस सध्या कसून चौकशी करत आहेत.

VIDEO: मोदींच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा पलटवार, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2019 04:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...