दूरदर्शनच्या टीमवर नक्षलवादी हल्ला : कॅमेरामनचा मृत्यू, २ जवान शहीद

छत्तीसगड निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर नक्षलग्रस्त दंतेवाडामध्ये दूरदर्शनच्या टीमवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. यामध्ये कॅमेरामनचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. या हल्ल्यात दोन जवानही शहीद झाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Oct 30, 2018 01:10 PM IST

दूरदर्शनच्या टीमवर नक्षलवादी हल्ला : कॅमेरामनचा मृत्यू, २ जवान शहीद

दंतेवाडा (छत्तीसगड), ३० ऑक्टोबर :नक्षलग्रस्त दंतेवाडाच्या अरणपूर भागात दूरदर्शनच्या टीमवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. यामध्ये कॅमेरामनचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. दोन जवानही शहीद झाले आहेत.

अर्चितानंद साहू हे मृत्युमुखी पडलेल्या कॅमेरामनचं नाव आहे.

दंतेवाडाचे DIG रतनलाल डांगी यांनी सांगितलं की, नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत सुरक्षा दलातला एक साहाय्यक निरीक्षक आणि एक सबइन्स्पेक्टरसुद्धा शहीद झाले आहेत.

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षली कारवायांची तीव्रता या भागात वाढली आहे. निवडणुका शांततामय मार्गानं होऊ नयेत यासाठी अडथळे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच दोन दिवसांपासून दंतेवाडा भागात सुरक्षादलाचे जवान आणि नक्षलवादी यांच्यात चकमकी सुरू आहेत.

अरणपूर ठाणा क्षेत्रात येणाऱ्या निलावाया गावात नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केला. हे जवान सर्चिंग ऑपरेशनसाठी जंगलात निघाले होते. या वेळी झालेल्या चकमकीत अनेक जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्यात २ जवानही मृत्युमुखी पडले आहेत.

अर्चितानंद साहू हे कॅमेरामन दिल्लीहून निवडणुकांचं वार्तांकन करण्यासाठी छत्तीसगडमध्ये गेले होते. याबाबत अधिक माहिती हाती आल्यानंतर बातमी अपडेट होईल.

नरभक्षक वाघीण पकडण्यासाठी आता वनविभागाची ही नवी शक्कल; कॅमेऱ्यात झाली कैद

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2018 01:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...