मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Nail Breaking Problem : तुमची नखं सतत तुटतात? हे सामान्य नाही, असू शकते 'या' आजारांचे लक्षण

Nail Breaking Problem : तुमची नखं सतत तुटतात? हे सामान्य नाही, असू शकते 'या' आजारांचे लक्षण

thelist.com

thelist.com

तुमची नखं फार वाढलेली नसली तरी लहान पण नीटनेटकी असली की तुमच्या सौंदर्यात भर पडते. तर तुटलेल्या नखांमुळे तुमचा मूड खराब होतो. तुमच्या या तुटणाऱ्या नखांमागे काही सामान्य कारणांबरोबरच काही गंभीर कारणंदेखील असू शकतात.

  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 10 ऑगस्ट : तुमच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या गोष्टींचा विचार केला तर, सुंदर त्वचा, सुंदर केस आणि त्यानंतर येतात सुंदर नखं. तुमची नखं फार वाढलेली नसली तरी लहान पण नीटनेटकी असली की तुमच्या सौंदर्यात भर पडते. तर तुटलेल्या नखांमुळे तुमचा मूड खराब होतो. मात्र तुमची नखं जर सतत तुटत असतील तर? तुमच्या या तुटणाऱ्या नखांमागे काही सामान्य कारणांबरोबरच काही गंभीर कारणंदेखील असू शकतात. हे मोठ्या समस्येचे लक्षण असू शकते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तुमची नखे तुटण्यामागे कोणकोणते आजार असू शकतात. हेल्थ हॅच या न्यूट्रिशन कंपनीच्या एक्सपर्ट निहारिका बुधवानी यांनी नुकतेच त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिले की, "तुमची नखे केराटिनपासून बनलेली असतात जी आपल्या हजाराची आणि पायाची बोटं सुरक्षित ठेवतात आणि आपल्यापैकी अनेकांची नखे ठिसूळ असतात, म्हणजेच ती तुटतात, किंवा सोलली जातात. पण तुम्हाला माहित आहे का की हे लोहाची कमतरता आणि हायपोथायरॉईडीझम सारख्या काही आरोग्य स्थितीमुळे होऊ शकते?"
लोह कमतरता जेव्हा शरीराला पुरेसे लोह मिळत नाही. तेव्हा ते लाल रक्तपेशींची पातळी कमी करते, ज्यामुळे नखे ठिसूळ होतात. तुमचे डॉक्टर तुमची फेरीटिन पातळी मोजू शकतात आणि पूरक आहार देऊ शकतात किंवा ते कमी असल्याचे आढळल्यास, लोहयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. हरजिंदगीने दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅनिमियाचे सर्वात सामान्य कारण किंवा रक्त पेशींची संख्या कमी असणे म्हणजे रक्तात पुरेसे लोह नाही. जास्त रक्त कमी झाल्यास असे होऊ शकते. जर तुम्हाला तुमच्या आहारात पुरेसे लोह मिळत नसेल किंवा तुमच्या शरीराला ते शोषण्यास असतील तर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असू शकते. अ‍ॅनिमियामुळे तुमची नखे ठिसूळ होऊ शकतात.

Taro Root Benefits : अळूच्या कंदाचा आहारात करा समावेश, ब्लडप्रेशर आणि शुगर लेव्हलही ठेवते नियंत्रित

हायपोथायरॉईडीझम हायपोथायरॉईडीझम असलेल्या महिलांना कोरडे, ठिसूळ आणि खडबडीत किंवा निस्तेज केस आणि पातळ नखे यासारख्या समस्या असू शकतात. यामध्ये नखे सहजपणे तुटतात. जेव्हा लोक थायरॉईड हार्मोन थेरपी सुरू करतात तेव्हा ही लक्षणे सहसा निघून जातात. हायपोथायरॉईडीझम किंवा अकार्यक्षम थायरॉईड, जेव्हा थायरॉईड ग्रंथी खूप कमी हार्मोन्स तयार करते तेव्हा उद्भवते. थायरॉईड हार्मोनच्या कमी पातळीमुळे मानसिक कार्यातील बदलांपासून ते पचनासंबंधित समस्यांपर्यंत विविध लक्षणे दिसतात.

Dill Leaves Benefits : ही छोटी छोटी पानं डायबिटीजसाठी ठरतील वरदान; अशा पद्धतीने करा आहारात समावेश

नखं तुटण्याच्या समस्येवर उपाय - तुम्हाला लोहाची कमतरता असल्यास, तुमच्या आहारात लोहयुक्त पदार्थ समाविष्ट करणे सुरू करा. - लोहासोबत व्हिटॅमिन-सी असलेले पदार्थ घेतल्याने लोहाचे शोषण चांगले होते. - तुम्हाला थायरॉइडची समस्या असल्यास, औषध बदलण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. - तसेच तुमच्या जीवनशैलीवर काम करा म्हणजेच संतुलित आहार घ्या आणि व्यायाम करा. त्याचबरोबर तुमच्या तणावाच्या पातळीवर काम करा.
First published:

Tags: Beauty tips, Health Tips, Lifestyle

पुढील बातम्या