भारत-पाक सीमेवर गोळीबार, महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण!

भारत-पाक सीमेवर गोळीबार, महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण!

कोपरगाव तालुक्यातील दहीगावचे जवान सुनील रावसाहेब वाल्टे यांना या गोळीबारात वीरमरण आलं आहे.

  • Share this:

अहमदनगर, 23 ऑक्टोबर : जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात भारतीय हद्दीत घुसखोर झालेल्या दहशतवाद्यांचा शोध बुधवारीही सुरू आहे. जम्मू काश्मीरच्या नौशेरा भागात मंगळवारी प्रत्यक्ष ताबारेषेजवळ Line of Control अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात नायब सुभेदार शहीद झाले. हे शहीद झालेले जवान हे अहमदनगरचे असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कोपरगाव तालुक्यातील दहीगावचे जवान सुनील रावसाहेब वाल्टे यांना या गोळीबारात वीरमरण आलं आहे. 40 वर्षीय सुनील वाल्टे हे नायब सुभेदार होते. रावसाहेबांविषयी अधिकाऱ्यांनी सांगितले की, "ते एक शूर, प्रेरणादायक आणि प्रामाणिक सैनिक होते. त्याचं बलिदान आणि कर्तव्यनिष्ठेसाठी राष्ट्र नेहमीच त्यांचे रुणी राहील."

वाल्टे यांनी सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर 5 वर्षांची मुदत वाढवून घेतली होती. पुढच्या काही दिवसांमध्येच ते सेवानिवृत्त होणार होते. पण गोळीबारामध्ये त्यांनी आपले प्राण गमावले. गोळी लागल्यानंतर त्यांना जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारांना यश आलं नाही आणि त्यांनी आपले प्राण गमावले.

वाल्टे यांच्या पश्चात घरी त्यांची आई, वडिल, पत्नी, एक मुलगी आणि एक 5 वर्षांचा मुलगा आहे. वाल्टे यांचे आई-वडिल शेतकरी आहेत. वाल्टे यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण हे दहीगावमधून पूर्ण केलं तर कोपरगावामध्ये 12वीपर्यंत शिक्षण घेऊन ते सैन्यात भर्तीत झाले.

इतर बातम्या - 'मराठी चित्रपटाला प्राईम टाइम द्या, अन्यथा खळखट्याक'; मनसेचा इशारा

गेले काही दिवस संचारबंदीमुळे शांत असलेल्या जम्मू काश्मीरमधून मंगळवारी संध्याकाळी एका चकमकीची बातमी आली. काश्मीरच्या सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले. त्यानंतर या भागातील घरांमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तपासणी सुरू केली. तेव्हा एका घरात दडलेले अतिरेकी समोर आले. या चकमकीत ठार झालेल्या अतिरेक्यांपैकी दोघे पाकिस्तानी असल्याचं स्पष्ट झालं. एक स्थानिक असल्याचं समजतं. संपूर्ण भागात सर्च ऑपरेशन सुरू असल्याचं सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितलं.

इतर बातम्या - विधानसभेच्या निकालापूर्वीच काढली विजयी मिरवणूक, NCPच्या 'या' उमेदवारावर गुन्हा

रविवारी (20 ऑक्टोबर) भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये नीलम खोऱ्यातले अतिरेकी तळ उद्ध्वस्त केले होते. तंगधर सेक्टरमध्ये घुसखोरांना मदत करण्यासाठी पाक सैन्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर भारतीय सेनेनं हा हल्ला केला आणि अतिरेकी तळांना लक्ष्य केलं.

जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द केल्यानंतर राज्यात सोशल मीडिया, इंटरनेट यावर निर्बंध आले होते. काश्मीरच्या मुख्य नेत्यांवर सुरक्षा दलांची नजर होती आणि सीमेवर कडक पहारा होता. प्रसारमाध्यमांवरही निर्बंध असल्याने गेल्या काही काळात काश्मीर खोऱ्यातून अशांततेची बातमी आली नव्हती.

इतर बातम्या - 'उदयनराजेंसाठी निवडणूक जिंकणं कठीण', शिवसेना नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2019 02:16 PM IST

ताज्या बातम्या