मुख्यमंत्र्यांचं नागपूर गँग रेपनं हादरलं, अल्पवयीन मुलीवर 4 कंडक्टरनी केला बलात्कार

मुख्यमंत्र्यांचं नागपूर गँग रेपनं हादरलं, अल्पवयीन मुलीवर 4 कंडक्टरनी केला बलात्कार

यात उमेश मेश्राम, धर्मपाल मेश्राम, आशिष लोखंडे आणि शैलेश वंजारी अशी आरोपींची नावं आहेत. या घटनेनंतर या चारही स्टार बस कंडक्टरला नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने कामावरून काढून टाकलं आहे.

  • Share this:

हर्षल महाजन, प्रतिनिधी

नागपुर, 06 मार्च : नागपूरमध्ये बलात्काराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 4 स्टार बस कंडक्टरने एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा प्रकार नागपूरच्या मानकापूर परिसरात घडला आहे. या प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

नागपुरातील १६ वर्षीय पीडीत एका शाळेतील विद्यार्थिनी आहे. पीडीत विद्यार्थिनी बसमधून रोज  शाळेत ये-जा करायची. याच काळात तिची आशिष या आरोपीशी ओळख झाली. आशिषने सुरुवातीला तिच्याशी मैत्री केली आणि नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला.

सगळ्याक धक्कादायक म्हणजे ही बाब त्याने त्याच्या सहकाऱ्यांना सांगितलं. त्यानंतर इतर तिघांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केले. बदनामीच्या भितीनं पीडित मुलगी गप्पा होती. नंतर आरोपींच्या आत्याचाराला कंटाळून पीडितेनी ही बाब आई-वडीलांना सांगितली. पीडितेच्या तक्रारीनंतर मानकापूर पोलिसांनी सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करत या चारही आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

यात उमेश मेश्राम, धर्मपाल मेश्राम, आशिष लोखंडे आणि शैलेश वंजारी अशी आरोपींची नावं आहेत. या घटनेनंतर या चारही स्टार बस कंडक्टरला नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने कामावरून काढून टाकलं आहे.

दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण नागपूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे नागपुरात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर सतर्कता म्हणून पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे.

कोणच्या दबावाखाली येत आपली मुलं आपल्यापासून काही लपवत तर नाहीत ना याचीही पालकांनी चौकशी करणं महत्त्वाचं आहे. कधीतरी त्यांच्या नकळत त्यांच्या शाळेत आणि मित्रांशी चर्चा करा. आपली मुलं कोणत्या तणावाखाली  तर नाहीत ना याचीही विचारपूस करा. याने असे धक्कादायक प्रकार होणार नाहीत.

VIDEO : 'बसंती' साठी तो पुलावर चढला, 'विरू'गिरी करणाऱ्या तरुणाला असं वाचवलं

First published: March 6, 2019, 6:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading