अभिनंदन यांनी पाकिस्तानला दिलेल्या उत्तराचा नागपूर पोलिसांनी केला 'असा' वापर

नागपूर पोलिसांनी लोकांची फसवणूक होऊ नये यासाठी एक महत्त्वाचा संदेश दिला आहे.

  • Share this:

भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्तमान शुक्रवारी रात्री पाकिस्तानमधून भारतात परतले. तब्बल 58 तासांहून जास्त वेळ पाकच्या ताब्यात राहिलेले अभिनंदन वाघा-अटारी सीमेवरून भारतात आल्यानंतर देशभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

भारताचे मिग 21 विमान कोसळल्यानंतर अभिनंदन यांना पाकिस्तानच्या लष्कराने ताब्यात घेतले होते. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांना जिनिव्हा करारानुसार भारताकडे सुपुर्द करण्यात आलं.

अभिनंदन यांना पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतल्यानंतरचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. त्यातील एका व्हिडिओत त्यांची पाकिस्तानी लष्कराकडून चौकशी करताना दिसत आहे.

पाकिस्तानच्या लष्कराने अभिनंदन यांना त्यांच्या मोहिमेबद्दल विचारले. त्याचबरोबर त्यांची माहिती देखील विचारली. तेव्हा त्यांनी 'मी तुम्हाला कोणतीही माहिती देऊ शकत नाही' असं स्पष्ट उत्तर दिलं.

अभिनंदन यांचे हे उत्तर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. त्यांच्या या उत्तराचा वापर करत नागपूर पोलिसांनी लोकांची फसवणूक होऊ नये यासाठी एक महत्त्वाचा संदेश दिला आहे.

सायबर सुरक्षा आणि ऑनलाईन फसवणूक रोखण्याच्या उद्देशाने नागपूर पोलिसांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, कोणी ओटीपी बाबत विचारणा केल्यास मी तुम्हाला कोणतीही माहितू देऊ शकत नाही असं उत्तर देण्यास सांगितलं आहे. नागपूर पोलिसांच्या या ट्वीटचे नेटीझन्सनीदेखील कौतुक केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 3, 2019 08:24 AM IST

ताज्या बातम्या