नागपूर, 01 जून : नागपूर (Nagpur) मधील काँग्रेस नेते त्रिशरण सहारे (Congress Leader Trisharan Sahare) यांना खंडणी (Ransom case) प्रकरणात नागपूर पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. कामठीमधील भू-माफिया रंजीत सफेलकरच्या सोबत झालेला आर्थिक व्यवहार पुढे आणू नये यासाठी विश्वजित किरदत्त यांना एक लाखाची खंडणी मागण्यात आली होती. ती घेताना त्रिशरण सहारे यांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यामुळं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
(वाचा-Bihar : 6-7 जणांनी दाम्पत्याला अडवलं, पत्नीबरोबर केलं गैरवर्तन Video देखिल बनवला)
सुत्रांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार कुख्यात रंजीत सफेलकर याला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याशी संबंधित प्रकरणांची पोलिसांनी चौकशी केली. त्यादरम्यान रंजीत सफेलकरच्या बँख खात्यांचीही चौकशी झाली. त्याच्या खात्यांच्या चौकशीमध्ये पोलिसांना समजलं की, सुमारे 4 वर्षांपूर्वी त्याच्या उमरेड रोडवरील टेमसना गावाजवळच्या 15 एकर सेतीची रक्कम सफेलकरच्या बँक खात्यातून राजघराण्यातील सदस्यांच्या खात्यात ट्रान्सफर केली आहे.
(वाचा-एक्सप्रेसमध्ये मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; आरडाओरड करताच ट्रेनमधून फेकलं)
ही बातमी वृत्तपत्रात प्रकाशित झाल्यानंतर सहारे राजघराण्यातील एका सदस्याला रंजीतबरोबरच्या फोटोवरून ब्लॅकमेल करत होता. या ब्लॅकमेलिंगला कंटाळल्यानं या सदस्यानं पोलिस आयुक्तांकडे याची तक्रार केली. त्यानंतर चौकशीत समोर आले की, बंडू सहारे नावाच्या व्यक्तीने राजघराण्यातील एका सदस्याशी संपर्क केला होता. तेव्हापासून तो ब्लॅकमेल करत होता. पत्रकारांकडे असलेला रंजीतबरोबरचा फोटो छापल्यास बदनामी होईल अशी धमकी देत, फोटो न छापण्यासाठी 2 लाख रुपयांची खंडणी मागितली.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशावर अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात पथकानं सहारेला पैसे देण्यासाठी नागपूरच्या मेयो रुग्णालय चौकात बोलावलं. त्यानंतर राजघराण्यातील सदस्यानं एक लाख रुपये दिले आणि उरलेले एक लाख नंतर देतो असं सांगितलं. सहारेने पैसे घेताच त्याला पकडणयात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Nagpur