मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

15 दिवसांची ताटातूट, कुशीत येताच 'ती' हसली आणि आईच्या डोळ्यात तरळले अश्रू

15 दिवसांची ताटातूट, कुशीत येताच 'ती' हसली आणि आईच्या डोळ्यात तरळले अश्रू


सलग 15 दिवस हे बाळ मातेपासून दूर होतं. आता या मातेचे नमुने निगेटिव्ह आले आणि पहिल्यांदाच मातेच्या हातात या बाळाला देण्यात आलं.

सलग 15 दिवस हे बाळ मातेपासून दूर होतं. आता या मातेचे नमुने निगेटिव्ह आले आणि पहिल्यांदाच मातेच्या हातात या बाळाला देण्यात आलं.

सलग 15 दिवस हे बाळ मातेपासून दूर होतं. आता या मातेचे नमुने निगेटिव्ह आले आणि पहिल्यांदाच मातेच्या हातात या बाळाला देण्यात आलं.

नागपूर, 14 मे : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी प्रत्येक जण आपली काळजी घेत आहे. परंतु, जगात पाऊल ठेवून काही तास होत नाही तेच एका नवजात बाळाला आईपासून दूर राहावे लागले. नागपूरच्या मेयो रुग्णालयात एका महिलेनं नवजात बाळाला जन्म दिला तर दुसरीकडे तिचे नमुने हे कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे या नवजात बाळाला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून बाळाला मातेपासून दूर ठेवावे लागले होते. हेही वाचा -लघुशंका करून येतो म्हणून गेला आणि जंगलात पळाला,पॉझिटिव्ह रिपोर्ट पाहून तरुण गायब सलग 15 दिवस हे बाळ मातेपासून दूर होतं. आता या मातेचे नमुने निगेटिव्ह आले आणि पहिल्यांदाच मातेच्या हातात या बाळाला देण्यात आलं.  आईच्या स्पर्शाने तान्हुल्या बाळाने स्मित हास्य केलं आणि या माऊलीच्या डोळ्यात अश्रू तरळले. अत्यंत भावूक असा क्षण पाहून डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर कर्तव्याचे समाधान पसरले. मोमीनपुरा येथील 26 वर्षीय महिला आपल्या एका नातेवाईकासोबत 28 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजता मेयोच्या स्त्री रोग व प्रसूती विभागात भरती झाली. ‘रेड झोन’ वसाहतीमधील रहिवासी असल्याने या महिलेचे स्वबचे  नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. हेही वाचा -धक्कादायक! कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या भाजप युवा मोर्चा नेत्याचा मृत्यू बुधवारी सकाळी तिच्या पोटात दुखू लागले. तिला प्रसुती कक्षात नेले आणि काही वेळातच नॉर्मल प्रसुती झाली. तिने मुलीला जन्म दिला. सुरक्षेची साधनं घालूनच डॉक्टरांनी ही प्रसुती केली. प्रसुतीनंतर 15 मिनिटांनी या महिला पॉझिटिव्ह आल्याची माहिती पुढे आली. यामुळे प्रसुती करणारे दोन डॉक्टर, दोन परिचारिका व दोन सफाई कर्मचाऱ्यांचे नमुने घेत त्यांना रुग्णालयातच क्वारंटाइन करण्यात आले. आईपासून चिमुकलीला कोरोना होऊ नये म्हणून डॉक्टरांनी तिला ‘एनआयसीयू’मध्ये ठेवले होते. अखेर ही आई आता कोरोनामुक्त झाल्यामुळे बाळाला तिच्याकडे सोपवण्यात आलं. संपादन - सचिन साळवे
First published:

पुढील बातम्या