नागपूर 6.3 अंश सेल्सिअस; थंडी आणखी वाढणार

नागपूर 6.3 अंश सेल्सिअस; थंडी आणखी वाढणार

  • Share this:

मुंबई, 22 डिसेंबर : वाऱ्याची दिशा आणि हवेच्या दाबाची स्थिती पाहता राजस्थान, गुजरात मार्गे उत्तर महाराष्ट्र व विदर्भात थंड वारे मोठ्या प्रमाणात येतील आणि सध्याची थंडी कायम राहणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. शिमला आणि काश्‍मीरसह उत्तरेतील अनेक भागात बर्फवृष्टी होणार असल्यामुळे पुढील्या 8 दिवसात मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कडाक्याची थंडी पडणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. शनिवारी सर्वीत कमी तापमानाची नोंद नागपूर येथे 6.3 अंश सेल्सीयस अशी झाली.

राजस्थानात अधिक हवेचा दाब निर्माण झाला असून, उत्तरेतील शीतलहर उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या दिशेने प्रवाहित होत आहे. यामुळे 25 डिसेंबर रोजी विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव जिल्ह्यांत थंडीचं प्रमाण सर्वाधिक राहणार आहे. तर नंदूरबार, नाशिक आणि पश्‍चिम महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण मध्यम राहील. 26 डिसेंबर रोजी मध्य आणि पूर्व विदर्भ तसेच मराठवाड्यात थंडीचे प्रमाण वाढेल तर उत्तर महाराष्ट्रात ते मध्यम स्वरूपाचे आणि कोकणात व मध्य महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण कमी होईल. 27 आणि 28 डिसेंबर रोजी उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण मध्यम स्वरूपाचं आणि विदर्भ आणि मराठवाड्यात ते अधिक राहील अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

थंडीमुळे फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक घटली

सद्या नाशिक जिल्हामध्ये थंडीचा पारा वाढल्याने बाजार समितीमध्ये फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. थंडी अधिक प्रमाणात पडल्याने फळभाज्यांच्या कळ्या गळत असून, दव पडल्याने पालेभाज्यांनाही बुरशी लागत आहे. आणि याचाच परिणाम म्हणून गेल्या दोन दिवसांपासून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. आवक घटल्याने याचा परिणाम भाजीपाला आणि फळभाजा यांच्या किमतीवर होत आहे. आवक अशीच सुरु राहिल्यास नाशिक सह मुंबई उपनगरातही भाजीपाल्याचे भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

थंडीच्या दिवसांमध्ये फळभाज्या आणि पालेभाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. मात्र, मागणी वाढली असली तरी थंडीचा परिणाम म्हणून आवक घटल्याने भाजीपाला आणि फळभाज्याचे दर वाढले असल्याची माहिती नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरुण काळे यांनी न्यूज18 लोकमतला दिली.

शनिवारी राज्यातील विविध ठिकाणचं किमान तापमान असं होतं..

मुंबई (कुलाबा) 20.0

मुंबई (सांताक्रूज) 16.1

अलिबाग 18.1

रत्नागिरी 18.1

पणजी (गोवा) 21.4

डहाणू 16.7

पुणे 11.7

अहमदनगर 9.7

जळगाव 9.2

कोल्हापूर 17.5

महाबळेश्वर 14.3

मालेगाव 10.8

नाशिक 9.6

सांगली 13.4

सातारा 13.9

सोलापूर 16.9

औरंगाबाद 11.6

परभणी 11.0

नांदेड 12.0

नागपूर 6.3

अकोला 12.0

अमरावती 10.2

बुलडाणा 12.0

ब्रम्हपूरी 9.2

चंद्रपूर 10.8

गोंदिया 9.8

वाशिम 12.8

वर्धा 10.4

यवतमाळ 9.0

First published: December 22, 2018, 10:32 PM IST

ताज्या बातम्या