नागपूरकरांच्या खऱ्यासाठी काहीही, छाप टाकल्यावर पोलीसही झाले हैराण

नागपूरकरांच्या खऱ्यासाठी काहीही, छाप टाकल्यावर पोलीसही झाले हैराण

गुजरात येथून नागपूरकडे तंबाखूजन्य पदार्थ चोरट्या मार्गाने घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

  • Share this:

इम्तियाज अली, प्रतिनिधी

जळगाव, 07 जुलै : गुजरात येथून नागपूरकडे तंबाखूजन्य पदार्थ चोरट्या मार्गाने घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता फुलगाव रेल्वे गेटजवळ ट्रकला पकडून तपासणी केली असता भांड्यांच्या खाली तंबाखूजन्य पदार्थ असल्याचे निदर्शनास आले. तब्बल 28 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरणगाव पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्याआधारे  सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप बोरसे पोलीस उपनिरीक्षक हर्षल भोये व त्यांच्या सहकाऱ्यांनी फुलगाव रेल्वे गेटजवळ सापळा रचला. या ठिकाणी ट्रक क्रमांक एमएच 40 बीजी 8266 थांबून तपासणी केली असता भांड्याच्या खाली संशयास्पद वस्तू आढळून आली.

'या' प्रख्यात कंपनीत शेकडो कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, फॅक्टरी बंद करण्याची मागणी

ट्रक घेऊन या ठिकाणी तपासणी केली असता तंबाखू सारखा सुगंधी पदार्थ की, जो खऱ्यासाठी वापरला जातो. मोठ्या प्रमाणात या सुगंधी तंबाखूची चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.

'कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मुंबईनं केलेल्या या चुका पुण्यानं टाळाव्यात अन्यथा...'

याबाबत पोलिसांनी जळगावचे अन्नसुरक्षा विभागाकडे संपर्क साधून त्यांच्याकडून चाचणी करण्याचे सुचवले यानुसार, आज अन्न सुरक्षा विभागाचे के आर साळुंखे यांनी येऊन खात्री केली आणि त्यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसांनी अन्नसुरक्षा व मानके 2006 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून दहा लाखाची तंबाखू व 18 लाखाचा ट्रक असे 28 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ट्रक चालक व क्लिनर ला पोलिसांनी अटक केली आहे.

संपादन - सचिन साळवे

Published by: sachin Salve
First published: July 7, 2020, 10:16 AM IST
Tags:

ताज्या बातम्या