अमर होण्यासाठी पाच जणांची हत्या करणाऱ्या विवेक पालटकरला अटक

बहीण आणि स्वता:च्या मुलासह पाच जणांची हत्या करणाऱ्या विवेक पालटकरला अखेर लुधियाना पंजाबमध्ये अटक करण्यात आली आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 21, 2018 11:31 PM IST

अमर होण्यासाठी पाच जणांची हत्या करणाऱ्या विवेक पालटकरला अटक

नागपूर,21 जून : बहीण आणि स्वता:च्या मुलासह पाच जणांची हत्या करणाऱ्या विवेक पालटकरला अखेर लुधियाना पंजाबमध्ये अटक करण्यात आली आहे.

नागपुरच्या आराधना नगरात काळजाचा थरकाप उडवणाऱ्या पालटकर कुटुंबाच्या हत्याकांडाचा अखेर उलगडा झाला. गेल्या आठवड्यात पाच जणांच्या हत्येनं नागपुर हादरलं होतं. या प्रकरणातील फरार आरोपी विवेक पालटकरनं आपली बहिण अर्चनासह तिची मुलगी वेदांती, पती कमलाकर, सासू मीराबाई यांची निर्घृण हत्या केली. एवढंच नाही तर विवेकनं आपल्या पोटच्या मुलालाही संपवलं. कारण त्याला हवं होतं गुप्तधन, अमरत्व आणि चिरतारुण्य...

अंधश्रद्धेचा बळी!, अमर होण्यासाठी पोटच्या गोळ्यासह 'त्या'ने पाच जणांना संपवलं

आरोपीच्या शोधासाठी पथके पाठवली होती पण भौतिक पुरावे आणि तपासकर्त्यांच्या माहितीनुसार अंधश्रद्देतून हे हत्याकांड झाल्याचा अंदाज आहे. घरात जादुटोण्याचे साहित्य, मिरची, लिंबू, हळद, कुंकू, बाहुली आणि कापलेले केस आढळले आहे असं सह पोलीस आयुक्त  शिवाजी बोडखे यांनी सांगितलं.

अखेर क्राईम ब्रांचनेन पालटकरला पंजाबमधून अटक केली आहे. त्याला लवकरच नागपुरात आणले जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2018 11:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...