News18 Lokmat

खळबळजनक... सरकारी वकिलाने लगावली न्यायाधीशांच्या कानशिलात

पाचवे दिवाणी न्यायाधीश रविकिरण देशपांडे यांना सहायक सरकारी वकील दीपेन पराते याने ही मारहाण केली.

News18 Lokmat | Updated On: Dec 26, 2018 05:33 PM IST

खळबळजनक... सरकारी वकिलाने लगावली न्यायाधीशांच्या कानशिलात

नागपूर, 26 डिसेंबर - नागपुरच्या जिल्हा सत्र न्यायालयात एका सहायक सरकारी वकिलाने न्यायाधीशांच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली. पाचवे दिवाणी न्यायाधीश रविकिरण देशपांडे यांना सहायक सरकारी वकील दीपेन पराते याने ही मारहाण केली. या प्रकरणात सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गजबजलेल्या नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या सातव्या माळ्यावर बुधवारी सकाळी पावणे 12 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सरकारी वकील दिपेन परातेच्या स्वतःच्या कौटुंबिक मालमत्ता हिस्सेवाटणीचं प्रकरण न्यायप्रविष्ट होतं. त्याचा बुधवारी निकाल लागला. हा निकाल विरोधात गेल्याने पराते याने न्यायाधीश किरण देशपांडे यांच्या कानशिलात लगावली. या घटनेमुळे न्यायालयात एकच खळबळ उडाली होती. घडल्या प्रकारानंतर न्यायालयात हजर असलेल्या पोलिसांनी दीपेन पराते याला अटक केली.

या संदर्भात शासकीय कामकाजात अडथळा आणल्याच्या कारणावरुन दीपेन परातेच्या विरोधात सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील बोंडे यांनी न्यूज18 लोकमतला दिली.


 VIDEO: पोलिसांनी पैसे कसे खावे यावर ट्रेनिंग सुरू आहे - अनिल गोटे

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 26, 2018 04:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...