Elec-widget

नागपूर हादरलं, पोत्यात सापडला शिर, हात आणि पाय नसलेला मृतदेह

नागपूर हादरलं, पोत्यात सापडला शिर, हात आणि पाय नसलेला मृतदेह

तलावात सापडलेल्या मृतदेहाला शिर, हात आणि पाय नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तर या संपूर्ण प्रकरणात गणेशपेठ पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे.

  • Share this:

नागपूर, 11 जुलै : अर्धवट शरीर असलेला एक मृतदेह तलावामध्ये आढळून आल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्या अंतर्गत गांधी सागर तलावामध्ये अज्ञात व्यक्तिचा अर्धवट मृतदेह पोत्यामध्ये आढळून आला आहे. त्यामुळे संपूर्ण नागपुरात सध्या भीतीचं वातावरण आहे.

तलावात सापडलेल्या मृतदेहाला शिर, हात आणि पाय नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तर या संपूर्ण प्रकरणात गणेशपेठ पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे. या प्ररकरणामध्ये मृतदेहाचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या 5 तुकड्या तयार करण्यात आल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

गावकऱ्यांनी तलावामध्ये पोत्यात मृतदेह पाहिल्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतला तो पोत्याच्या बाहेर काढला असता त्याला शिर, हात आणि पाय नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटण्यात अडचणी येत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी व्यक्तीची हत्या एका वेगळ्याच ठिकाणी केली. त्याच्या शरीराचे तुकडे करून ते कुठे वेगळ्या ठिकाणी टाकण्यात आले असावे तर त्यानंतर अर्धवट मृतदेह पोत्यात टाकून ते तलावात फेकून दिल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस आता या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. त्यासाठी पोलिसांच्या 5 तुकड्या स्थानिक पातळीवर चौकशी करत आहेत. दरम्यान, गावात अशा पद्धतीने एखाद्याची हत्या झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे या प्रकरणाचा लवकरात-लवकर छडा लावण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

Loading...

VIDEO: भरधाव कारची दुकानाला धडक, अपघाताची घटना CCTVमध्ये कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 11, 2019 02:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...