Home /News /news /

नागपूरच्या महापौरांचा तुकाराम मुंढेंवर निशाणा, म्हणाले...

नागपूरच्या महापौरांचा तुकाराम मुंढेंवर निशाणा, म्हणाले...

नागपूरच्या आमदार निवास आणि इतर ठिकाणी कोरोना संशयितांना एकत्र क्वारंटाइन करून ठेवण्यात आलं आहे.

नागपूर, 21 एप्रिल : नागपुरात दररोज कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय. यासाठी महापालिका प्रशासन जबाबदारी असल्याचा आरोप नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी अप्रत्यक्षपणे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर निशाणा साधला आहे. नागपूरच्या आमदार निवास आणि इतर ठिकाणी कोरोना संशयितांना एकत्र क्वारंटाइन करून ठेवण्यात आलं आहे. यातील अनेकजण एकत्रितपणे वावरत आहेत. ज्यावेळी तपासणी अहवाल आला. त्यावेळी यातील काहींचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, तोपर्यंत त्यांच्यामुळे इतरांनीही लागण होते. त्यामुळं आधी तपासणी करून जे पॉझिटिव्ह येताहेत त्यांच्यावर उपचार आणि जे निगेटिव्ह येताहेत त्यांनाच क्वारंटाइन करून ठेवावे, असा सल्ला महापौरांनी दिला आहे. हेही वाचा -'मी कोरोनाशी लढतोय अन् माझी मुलं भुकेशी', एका पित्याची थक्क करणारी कहाणी तसंच, 'हे करताना ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं आहेत. त्यांना लाल आणि ज्यांना नाही त्यांना हिरवा टॅग लावा. असं न केल्यास जर शहरात कोरोनाबाधितांचा आकडा आणखी वाढला तर याला सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असं म्हणत महापौरांनी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचं नाव न घेता टीका केली. सतरंजीपुऱ्यात मिल्ट्री तैनात करा,भाजप आमदाराची मागणी दरम्यान, सतरंजीपुरा परिसरात पुन्हा कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्याने या भागात दहशतीचे वातावरण तयार झाले असून, आज नागपूर शहरात असलेल्या एकूण रुग्णांपैकी निम्म्यापेक्षाही अधिक रुग्ण सतरंजीपुरा संपर्कातील आहेत. हा परिसर पोलीस विभागाने सील केलेला असूनदेखील रुग्ण दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे हा परिसर मिल्ट्रीच्या स्वाधीन करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी  केली आहे. हेही वाचा - देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला, या 2 महत्त्वपूर्ण विषयांवर झाली चर्चा याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांना पत्रही लिहिले आहे. सतरंजीपुरा येथील परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणली नाही तर भविष्यात स्थिती नियंत्रणाबाहेर होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही खोपडे यांनी म्हटलं आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: Nagpur

पुढील बातम्या