कॉलेजला दांडी मारल्याचं, घरी कळल्याच्या भीतीने नागपुरात 2 मुलींची आत्महत्या !

कॉलेज बंक केल्याचं घरी कळलं, म्हणून नागपूरात दोन मुलींनी तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. आपण कॉलेजला दांडी मारल्याचं घरच्यांना कळालं तर आता ओरडा बसणार, या भीतीनं या 2 मुलींनी कोराडी तलावात उडी मारल्याचं पोलिसांनी सांगितलंय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Nov 11, 2017 01:42 PM IST

कॉलेजला दांडी मारल्याचं, घरी कळल्याच्या भीतीने नागपुरात 2 मुलींची आत्महत्या !

नागपूर, 11 नोव्हेंबर : कॉलेज बंक केल्याचं घरी कळलं, म्हणून नागपूरात दोन मुलींनी तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. आपण कॉलेजला दांडी मारल्याचं घरच्यांना कळालं तर आता ओरडा बसणार, या भीतीनं या 2 मुलींनी कोराडी तलावात उडी मारल्याचं पोलिसांनी सांगितलंय. आसना रोकडे आणि मनीषा पटेल अशी या मयत मुलींची नावं आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्या बेपत्ता होत्या.

आज सकाळी त्यांचे मृतदेह कोराडी तलावात सापडले. त्या दोन्ही मुली 12वीमध्ये शिकत होत्या, त्यांचं वय अवघं 17 वर्षं होतं. गुरुवारी त्या कॉलेज बंक करून मित्रांबरोबर फिरायला गेल्या होत्या. ते घरच्यांना कळलं. याला घाबरूनच त्यांनी आपलं जीवन संपवलं. एवढ्याशा शुल्लक कारणावरून या मुलींनी स्वतःचं जीवन संपवल्याने नागपुरात हळहळ व्यक्त होतेय. म्हणूनच या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या मुलांशी संवाद वाढवण्याची गरज व्यक्त होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 11, 2017 01:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...