नागपुरातील भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याची मध्यप्रदेशात हत्या

नागपुरातील भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याची मध्यप्रदेशात हत्या

नागपूरच्या अतूल डहरवाल या तरुण व्यापाऱ्याचे अपहरण करून खून केल्याची घटना घडली आहे. गेल्या दीड महिन्यातील नागपूर शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ इतवारी मधील व्यापाऱ्याच्या अपहरणाची आणि हत्येची ही तिसरी घटना असल्याने व्यापारी वर्ग पुरता हादरून गेलाय.

  • Share this:

10 जानेवारी, नागपूर : नागपूरच्या अतूल डहरवाल या तरुण व्यापाऱ्याचे अपहरण करून खून केल्याची घटना घडली आहे. गेल्या दीड महिन्यातील नागपूर शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ इतवारी मधील व्यापाऱ्याच्या अपहरणाची आणि हत्येची ही तिसरी घटना असल्याने व्यापारी वर्ग पुरता हादरून गेलाय. खून झालेले व्यापारी अतूल हरलवाल हे भाजपच्या युवा मोर्चाचे माजी उपाध्यक्ष होते. तसंच ते प्रापर्टी डिलिंगचे काम करायचे.

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील लोधीखेडा येथील जंगलात एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी या मृतदेहावरील कपड्यांच्या खिशातील चिठ्ठूीवरून हा मृतदेह नागपूरच्या नंदनवन परिसरात हॉटेल चालवणाऱ्या अतूल डहरवाल यांचा असल्याची ओळख पटवली. पण अतूलची कार नागपूरच्या घरीच असल्याने तो मध्यप्रदेशात कसा पोहचला आणि त्याची हत्या केव्हा झाली या प्रश्नांची उत्तरे डहरवाल कुटुंबियांना सापडत नाहीये.

अतुलला व्यापारातील काही पैसे शिव नावाच्या व्यक्तीकडून घ्यायचे होते त्यामुळे या शिव नावाच्या व्यक्तीने त्याचे अपहरण करून त्याचा खून केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

आरोपी शिव सध्या मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात आहे पण गेल्या दीड महिन्यातील व्यापाऱ्याचे अपहरण आणि हत्येचे हे तिसरे प्रकरण असल्याने या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची मागणी अतुलच्या कुटुंबियांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणामुळे हादरलेल्या गांधीबाग आणि इतवारीतील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध केला आहे. डिसेंबर मध्ये लॉटरी व्यावसायिक राहुल आग्रे आणि राजू नारंग यांचेही असेच अपहरण करून खून केल्यानंतर मृतदेह फेकून देण्याची घटना घडली होती. या प्रकरणातही आरोपींच्या मनात कायद्याची भीती उरली नसल्याचं दिसतय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 10, 2018 02:02 PM IST

ताज्या बातम्या