भाजपचे महापौर आणि नगरसेवकाला हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्लान, आरोपीचे बड्या नेत्यांशी संबंध

भाजपचे महापौर आणि नगरसेवकाला हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्लान, आरोपीचे बड्या नेत्यांशी संबंध

नागपुरचे महापौर संदीप जोशी आणि नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्लॅन करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे.

  • Share this:

नागपूर, 18 जुलै: नागपुरचे महापौर संदीप जोशी आणि नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्लॅन करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. त्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अटकेतील आरोपी हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचं वक्तव्य केल्यानं महापौर संदीप जोशी आक्रमक झाले आहेत. महापौर जोशी यांनी आता गृहमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा...पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या भामट्याचा पुण्यात फिल्मी स्टाईल पाठलाग

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी हनीट्रॅपप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे. हनीट्रॅपप्रकरणी अटक केलेला आरोपी हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. यावरून महापौर संदीप जोशी यांनी अनिल देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

आरोपी साहिल सय्यद हा भाजपपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचा दुपट्टा घालून त्यांच्याच कार्यक्रमात अधिक दिसतो. मग गृहमंत्र्यांना कशाची भीती वाटते, त्यांच्यावर कारवाई का करत नाही, असा सवाल संदीप जोशी यांनी केला आहे.

हेही वाचा...पत्नीला कोरोनाची लागण! शिवसेनेच्या या मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

भाजप आणि राष्ट्रवादीत 'लेटर वॉर'

नागपुरचे महापौर संदीप जोशी आणि नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्लॅन करणारी ऑडिओ क्लिपवरून भाजप आणि राष्ट्रवादी आमने-सामने आली आहे. सध्या भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये 'लेटर वॉर' सुरू झाल आहे. आरोपी साहिल सय्यदचे भाजपसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. मात्र, तरी देखील 'तो आमचा नव्हेच' असा सूर तिन्ही पक्षाचे नेते काढताना दिसत आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: July 18, 2020, 2:48 PM IST

ताज्या बातम्या