दहावी-बारावीच्या परीक्षेत गोलमाल, बनावट उत्तर पत्रिका घेऊनच विद्यार्थी शिरले वर्गात

दहावी-बारावीच्या परीक्षेत गोलमाल, बनावट उत्तर पत्रिका घेऊनच विद्यार्थी शिरले वर्गात

परीक्षा केंद्रात बनावट ओळखपत्राच्या आधारे परीक्षार्थी म्हणून बसलेल्या ठगबाजांनी दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिकेसोबत बोर्डाच्या उत्तरपत्रिकाही बाहेर आणल्या.

  • Share this:

हर्षल महाजन, प्रतिनिधी,

नागपूर, 13 मार्च : नागपूरात दहावी आणि बारावीच्या बोगस परीक्षार्थ्यांचं रॅकेट उघड झालं आहे. जरीपटका पोलीसांनी बोगस परीक्षार्थींवर कारवाई करत तीन जणांना अटक केली आहे. या सगळ्या धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे नागपूरच्या शिक्षण व्यवस्थेचा काळा चेहरा समोर आला आहे.

आरोपींकडून उत्तर पत्रिका आणि बनावट प्रवेशपत्र पोलिसांनी केलं जप्त केलं आहे. या बोगस परीक्षार्थ्यांच्या रॅकेटमध्ये बडे मासे अडकण्याची शक्यता असल्याचा अंदाजही पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे बोगस परीक्षार्थींची ही टोळी गेल्या दोन वर्षांपासून सक्रीय असल्याची माहिती आहे.

परीक्षा केंद्रात बनावट ओळखपत्राच्या आधारे परीक्षार्थी म्हणून बसलेल्या ठगबाजांनी दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिकेसोबत बोर्डाच्या उत्तरपत्रिकाही बाहेर आणल्या. त्याबदल्यात बनावट उत्तरपत्रिकांवर उत्तरे लिहून त्या परीक्षा केंद्राधिकाऱ्यांच्या स्वाधीन केल्या.

अशा अफलातून प्रकारे शिक्षण विभागाची फसवणूक करण्याचं खळबळजनक प्रकरण नागपूरात उघडकीस आलं आहे. जरीपटका पोलिसांनी या प्रकरणात अतुल शिवमोहन, चंद्रकांत मते आणि अमन मुकेश मोटघरे या तिघांना अटक केली आहे. त्यांचा चौथा साथीदार अल्पवयीन असल्याचं जरीपटका पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

कॉपी टाळण्यासाठी परीक्षेपूर्वी कपडे काढून तपासणी, घाबरुन विद्यार्थिनीनं केली आत्महत्या

1 मार्च रोजी जशपूर येथील एका परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे कपडे काढून तपासणी करण्यात आली होती. वेगवेगळ्या खोल्यांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान एका विद्यार्थ्याकडे कॉपी आढळल्यानं त्याला शाळेतून काढण्यात आलं. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. तपासणी सुरू असतानाच एक विद्यार्थिनी इतकी घाबरली की तिने आत्महत्याच केली.

याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी चौकशीची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 4 मार्चला मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर ही घटना उघडकीस आली. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी मुलीने शाळेत घडलेला प्रकार भावाला सांगितला होता.

VIDEO : भाजपला मोठा धक्का, माढ्यातून 'या' मंत्र्यांने घेतली माघार

First published: March 13, 2019, 8:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading