दुसरीकडं भिंडमध्येही पोलिस प्रशासनाच्या कठोर भूमिकेनंतरही लोक लग्नात गर्दी करत असल्याचं पाहायला मिळालं. भिंडच्या ऊमरी ठाण्याच्या परिसरात असा एक प्रकार पाहायला मिळालं. याठिकाणी वरातीत नाचणाऱ्यांना पोलिसांनी शिक्षा म्हणून बेडूक उड्या मारायला लाल्या. नवरदेव आणि मंडपवाल्याच्या विरोधात या प्रकरणी गुन्हादेखिल दाखल करण्यात आला आहे. (वाचा-Good News : भारतात तयार होतेय अधिक प्रभावी Corona Vaccine, 8 पट अधिक अँटिबॉडीज) याठिकाणी लग्नासाठी 500 लोकांना बोलावण्यात आलं होतं. पोलिस पोहोचले तेव्हा 200 हून अधिक लोक होते. तेव्हा पोलिसांना पाहून लोक पळू लागले तर पोलिसांनी घेराव घालत त्यांना पकडलं. वरातीत नाचणाऱ्यांना मैदानावर बेडूक उड्या मारण्याची शिक्षा दिली. विशेष म्हणजे हा कार्यक्रम शासकीय इमारतीमध्ये सुरू होता. त्याची परवानगी कोणी दिली याचा तपास घेतला जात आहे.#Datia- मध्यप्रदेश के दतिया में कोरोना कर्फ़्यू के दौरान बारातियों से पुलिस ने सजा के तौर पर कराया नागिन डांस#MadhyaPradesh #lockdown2021 #CoronaCurfew @MPPolice2 @MPPoliceOnline @MpPoliceOffici1 pic.twitter.com/OTDhyYe7GY
— VIPIN YADAV (Journalist) (@Vipinyadav2987) May 20, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Lockdown, Madhya pradesh, Police action