शेवगाव-पैठण पट्ट्यात ऊस दर आंदोलन पेटलं, गोळीबारात 2 शेतकरी जखमी

शेवगाव-पैठण पट्ट्यात ऊस दर आंदोलन पेटलं, गोळीबारात 2 शेतकरी जखमी

शेवगाव तालुक्यात घोटण येथे सुरु असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. आज सकाळी 6 वाजता संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश तात्या बालवडकर आणि अमर कदम यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बळाचा वापर करून अटक केल्याने कार्यकर्ते भडकलेत.

  • Share this:

15 नोव्हेंबर, अहमदनगर: शेवगाव तालुक्यात घोटण येथे सुरु असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. आज सकाळी 6 वाजता संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश तात्या बालवडकर आणि अमर कदम यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बळाचा वापर करून अटक केल्याने कार्यकर्ते भडकलेत.

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी खानापूर परिसरात टायर जाळून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची तोडफोडही केली. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुका अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव या दोन शेजारच्या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने हे आंदोलन पेटलंय. खानापूर, घोटण, तळेवाडी, पातेगाव, पाठण येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांचा हा उद्रेक होता. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन शेतकरी गंभीर जखमी झालेत. पोलिसांनी मात्र, गोळीबार केलाच नसल्याचा दावा केलाय. आंदोलनामुळे प्रभावित झालेल्या 7 गावांमध्ये जिल्हा प्रशासनाने तात्काळ जमावबंदी लागू केलीय. या पट्ट्यात 4 साखर कारखाने आहेत. मधूकर मुळे यांच्या गंगामाई साखर कारखान्याच्या परिसरात हे आंदोलन पेटलंय.

दरम्यान, खासदार राजू शेट्टी यांनी प्रशासन आणि आंदोलन या दोघांनाही सबुरीने घेण्याचा सल्ला देत, संतप्त आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केलंय.

First published: November 15, 2017, 2:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading