News18 Lokmat

शिवजयंतीबद्दल अपशब्द वापरणारा नगरचा उपमहापौर छिंदम अटकेत

शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम याला अखेर पोलिसांनी अटक केलीय. नगर -सोलापूर रोडवरील दरेवाडीतून पोलिसांनी छिंदमला अटक केलीय. आज दिवसभर छिंदमच्या अटकेसाठी नगर शहरात आंदोलनांचा भडका उडाला होता.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Feb 16, 2018 11:10 PM IST

शिवजयंतीबद्दल अपशब्द वापरणारा नगरचा उपमहापौर छिंदम अटकेत

16 फेब्रुवारी, अहमदनगर : शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम याला अखेर पोलिसांनी अटक केलीय. नगर -सोलापूर रोडवरील दरेवाडीतून पोलिसांनी छिंदमला अटक केलीय. आज दिवसभर छिंदमच्या अटकेसाठी नगर शहरात आंदोलनांचा भडका उडाला होता. श्रीपाद छिंदम हा भाजपचा उपमहापौर होता. त्याची शिवजयंतीबद्दल अपशब्द वापरल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होताच नगर शहरात संतापाची लाट उसळली होती. शिवसेनेनं त्याच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. तर राष्ट्रवादीने छिंदम विरोधात मोर्चा काढला होता. त्यानंतर भाजपने त्याची उपमहापौर पदावरून तात्काळ हकालपट्टी करून त्याला पक्षातूनही काढून टाकलंय. स्वतः श्रीपाद छिंदम यानेही झाल्या प्रकाराबद्दल जाहीर माफी मागितली होती. तरीही शिवसेना, राष्ट्रवादी आणि संभाजी ब्रिगेड श्रीपाद छिंदम याच्या अटकेसाठी आग्रही होते. त्यानंतर पोलिसांनी अखेर त्याला अटक केलीय.

भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे यांच्याशी फोनवरून बोलताना शिवजयंतीविषयी अपशब्द वापरल्याची ऑडियो क्लिप व्हायरल होती. तसंच संबंधीत कर्मचाऱ्याने युनियनकडे तक्रारही केली होती. ही ऑडिओ क्लिप व्हायरल होताच शिवसेनेनं छिंदम यांच्या कार्यालयावर तुफान दगडफेक केली आणि त्यांच्या कार्यालयाची मोडतोडही केलीय. शिवसेनेसोबतच संभाजी ब्रिगेडही छिंदम यांच्याविरोधात रस्त्यावर उतरल्याने भाजपने शहरातलं वातावरण चिघळू नये, यासाठी छिंदम यांची तात्काळ उममहापौरपदावरून हकालपट्टी केलीय. स्वतः खासदार दिलीप गांधी यांनीच या कारवाईची माहिती दिलीय.

दरम्यान, या ऑडिओ क्लिपनंतर शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. श्रीकांत छिंदम यांच्याविरोधात राष्ट्रावादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढण्यात आला, तर शिवसेनेनंही छिंदम यांचा पुतळा जाळून निषेध केला आहे. तिकडे औरंगाबादमध्येही श्रीपाद छिंदम विरोधात आंदोलन केलं होतं. या क्लिपमुळे शिवसेना आणि भाजपमधला अंतर्गत तणाव पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 16, 2018 09:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...