दोन हजार पक्षांचा 'बाबा', म्हैसुरमधल्या पक्षी संग्रहालयाची गिनीज बुकात नोंद!

दोन हजार पक्षांचा 'बाबा', म्हैसुरमधल्या पक्षी संग्रहालयाची गिनीज बुकात नोंद!

उद्योगपती आनंद महिंद्र यांनी म्हैसुरमधल्या एका पक्षी संग्रहालयाचा ट्विटरवर टाकलेला व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. एवढी विविधता असताना अशी केंद्र जागतिक दर्जाची पर्यटनस्थळ बनायला पाहिजेत असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

  • Share this:

म्हैसुर,ता.27 एप्रिल: उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आज म्हैसुरजवळच्या एका पक्षी संग्रहालयाचा एक व्हिडीओ ट्विट केला आणि सोशल मीडियावर तो चांगलाच व्हायरल झाला. महिंद्रा हे आपल्या ट्विटरवर उत्तम फोटो आणि व्हिडीओ ट्विट करत असल्यानं सोशल मीडियावर त्यांची नेहमीच चर्चा असते.

हा व्हिडीओ आहे म्हैसुरमधल्या सुखवनाचा. डॉ.गणपती स्वामी हे अध्यात्मिक गुरू या सुखवनाचे संस्थापक आहेत. 2012 मध्ये त्यांनी या पक्षी संग्रहालयाची स्थापना केली. यात 468 प्रजातिंचे तब्बल 2 हजार 100 पक्षी असून त्यात काही दुर्मिळ पक्षांचाही समावेश आहे. एकाच पक्षी संग्रहालयात एवढ्या विविध प्रजातींचे पक्षी असल्यानं त्याची गिनीज बुकामध्येही नोंद झालीय.

या पक्षीसंग्रहालयात पक्षांचं पुनर्वसन केंद्र आणि त्यांच्यासाठी अत्याधुनिक दवाखानाही आहे. स्वामीजी त्यांना खायला तर घालतातच त्याच बरोबर त्यांची सेवा-सुश्रृषाही करतात. या सुखवनातच बोन्सायचं खास उद्यानही असून त्यात अडीच हजारांपेक्षा जास्त बोन्सायची झाडं आहेत.

पक्षी आणि झाडांची एवढी विविधता असताना सुखवन हे जागतिक पर्यटनाचं केंद्र का होऊ शकत नाही असा सवालही महिंद्रा यांनी विचारला आहे.

First published: April 27, 2018, 5:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading