वरमाला घालतानाच नवरदेवाच्या वडिलांची हत्या, नवरीऐवजी मृतदेह घेऊन परतलं वऱ्हाड

वरमाला घालतानाच नवरदेवाच्या वडिलांची हत्या, नवरीऐवजी मृतदेह घेऊन परतलं वऱ्हाड

धुमधडाक्यात नवरदेव स्टेजवर आला. नवरीदेखील आली. त्यानंतर वरमाला घालण्याची विधी सुरू होताच फॉग उडवण्यावरून काही गटांमध्ये स्टेजवरच हाणामारी झाली.

  • Share this:

बिहार, 07 मे : मुलाच्या लग्नात वडिलांची हत्या झाल्य़ाचा धक्कादायक प्रकार बिहारमध्ये घडला आहे. मुलाचं लग्न सुरू असतानाच असा काही प्रकार घडला की त्यामध्ये वडिलांची हत्या झाली. लग्नाचा कार्यक्रम असल्यामुळे संपूर्ण मंडपात आनंदाचं वातावरण होतं. पण एका क्षणात सगळं उद्ध्वस्त झालं.

धुमधडाक्यात नवरदेव स्टेजवर आला. नवरीदेखील आली. त्यानंतर वरमाला घालण्याची विधी सुरू होताच फॉग उडवण्यावरून काही गटांमध्ये स्टेजवरच हाणामारी झाली. यामध्ये नवरदेवाच्या वडिलांना गंभीर दुखापत झाली आणि त्यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला.

कुंदन शर्मा असं मुलाचं नाव आहे तर लक्ष्मण शर्मा असं त्याच्या वडिलांचं नाव आहे. या सगळ्या प्रकारामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. झालेल्या प्रकारावर संताप व्यक्त करत कटरा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली. पण पोलिसांनी सहकार्य न केल्यामुळे शर्मा कुटुंबीयांनी रस्ता रोको आंदोलन केलं.

या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाचं वातावरण आहे. कुटुंबीयांनी रास्ता रोको केल्यामुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला आणि मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. लग्नाच्या दिवशीच वडिलांना अशा पद्धतीने गमावल्यामुळे संपूर्ण शर्मा कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

या प्रकरणात आता पोलिसांनी कसून तपास सुरू केला. तर नेमका काय वाद झाला. आणि मारहाण कोणी यासंबधी चौकशी करण्याचं काम पोलीस करत आहेत.

VIDEO : मनसेच्या पदाधिकाऱ्याची दादागिरी, सहाय्यक आयुक्तांना अर्वाच्च शिवीगाळ

First published: May 7, 2019, 6:52 PM IST
Tags: Bihar News

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading