Elec-widget

'मी तुम्हाला मत दिलं,आता तिहेरी तलाक बंद करा'

'मी तुम्हाला मत दिलं,आता तिहेरी तलाक बंद करा'

उत्तर प्रदेशच्या बरेलीतल्या एका महिलेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय. तिहेरी तलाकची पद्धत कायद्यानं बंद करा आणि तिहेरी तलाक देणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद करा

  • Share this:

30 मार्च : उत्तर प्रदेशच्या बरेलीतल्या एका महिलेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय. तिहेरी तलाकची पद्धत कायद्यानं बंद करा, आणि तिहेरी तलाक देणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद करा, अशी मागणी निदा खान या महिलेनं केलीये.

मी माझ्या घरच्यांविरोधात जाऊन तुम्हाला मत दिलं, आता तुम्ही मला न्याय द्या, असं आव्हानही तिनं पंतप्रधानांना केलंय. तिच्या पतीनं तिला नुकताच तिहेरी तलाक दिला. त्याविरोधात ती एकटी लढा देतेय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनाही तिनं पत्र लिहिलंय. सोशल मीडियावरूनही ती तिचा संदेश पोहचवण्याचा प्रयत्न करतेय.

निदा खान काय म्हणते...

"मी भाजपला मतदान केलं. त्यांनी जाहीरनाम्यात तिहेरी तलाकच्या विरोधात आवाज उचलला. त्यामुळे कुटुंबाच्या विरोधात जाऊन मतदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे मी पंतप्रधानांना पत्र लिहिलं. आणि एक पत्र आदित्यनाथ यांनाही लिहिलं. तिहेरी तलाक पद्धत बंद व्हावी. आणि जी लोकं तिहेरी तलाक देतात त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि त्यांना 3 ते 4 लाखांचा दंड ठोठवला पाहिजे. तसंच ही पद्धत लवकरात लवकर बंद झाली पाहिजे"

दरम्यान, उत्तरप्रदेशमध्ये संघ आणि मुस्लिम संघटनांनी एकत्र येऊन तिहेरी तलाक विरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू केलीये. या मोहिमेअंतर्गत 10 लाखांहुन अधिक मुस्लिमांनी स्वाक्षरी केल्या आहेत. यात महिलांची संख्या मोठी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 30, 2017 06:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...