'मुस्कुराएगा इंडिया' कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी मोदींचा स्टार्ससोबतचा VIDEO न चुकता बघा

'मुस्कुराएगा इंडिया' कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी मोदींचा स्टार्ससोबतचा VIDEO न चुकता बघा

सध्या आपला देश एक कोरोनाच्या संकाटातून जात आहे. अशात आपल्याला ताकद आणि संयंमाची अत्यंत गरज आहे. ही सकारात्मकता आपल्यासाठी घेऊन काही कलाकारांनी एक सुंदर गाणं प्रदर्शित केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 मार्च : आपल्या उत्साह ताकद वाढवण्यासाठी, मनाला शांती देण्यासाठी संगीत एक उत्तम माध्यम आहे. सध्या आपला देश एक कोरोनाच्या संकाटातून जात आहे. अशात आपल्याला ताकद आणि संयंमाची अत्यंत गरज आहे. ही सकारात्मकता आपल्यासाठी घेऊन काही कलाकारांनी एक सुंदर गाणं प्रदर्शित केलं आहे. 'फिर मुस्कुराएगा इंडिया...' असं गाणं 6 एप्रिल रोजी प्रदर्शित झालं. यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा आपला देश जिंकणारच असा विश्वास भारतीयांना देत आहेत. यासंबंधी मोदींनी एक ट्वीटही केलं आहे.

जगभरात कोरोनोव्हायरसचा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर चित्रपटसृष्टीतील नामांकित कलाकारांनी सकारात्मकता आणण्यासाठी हे गाणं आपापल्या घरातील शूट करून तयार केलं आहे. या गाण्याचे बोलंही तुमच्या मनाला भावतील असेच आहेत. अभिनेता अक्षय कुमार आणि निर्माता जॅकी भगनानी यांनी हा खास उपक्रम राबवला आहे.

'फिर मुस्कुराएगा इंडिया...' या नवीन गीताद्वारे भारतातील लोकांमध्ये सकारात्मक उर्जा भरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन सामना केला तर आपला देश पुन्हा हसेल आणि या युद्धात जिंकेल असं या गाण्यात अक्षय कुमारने म्हटलं आहे. शहरात पुन्हा उजळेल, गावात पुन्हा आनंद असेल, पुन्हा सगळं नव्याने सुरू होईल पण त्यासाठी देशाने एकत्र येण्याची आणि संयमाची गरज असल्याचं या गाण्यातून सांगण्यात आलं आहे.

जॅकी भगनानी म्हणाले की 'हे गाणे सर्व भारतीयांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी तयार करण्यात आलं आहे. अक्षय आणि मला वाटले की या लॉकडाऊनच्या काळात लोक फक्त आशेवर अवलंबून आहेत आणि तिथून आम्हाला या गाण्याची कल्पना आली. या गाण्यात मदत करणाऱ्या आमच्या सर्व मित्रांचे आभारी आहोत ज्यांनी आम्हाला हे गाणं तयार करण्यास मदत केली. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गाण्यातून होणारी कमाई ही व्हायरस विरूद्ध लढा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या कामाला दिली जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2020 09:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading