कुटुंबाच्या हट्टामुळे 2 दिवस तरुणाचा मृतदेह आहे पडून, लघवी करण्यावरून केला होता खून

कुटुंबाच्या हट्टामुळे 2 दिवस तरुणाचा मृतदेह आहे पडून, लघवी करण्यावरून केला होता खून

कुटुंबियांनी चक्क दोन दिवस मृतदेह असाच ठेवला आहे. अद्याप तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

  • Share this:

उस्मानाबाद, 21 ऑगस्ट : लघवी करण्यावरून 20 वर्षीय तरूणाची हत्या करण्यात आली. पण त्यानंतर आरोपीला अटक करा या मागणीसाठी कुटुंबियांनी चक्क दोन दिवस मृतदेह असाच ठेवला आहे. अद्याप तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले नसल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिले समोर लघवी केल्याचा राग धरून पारधी समाजातील 20 वर्षीय युवकाचा खून करण्यात आला आहे. तब्बल 6 जणांनी तरुणाची हत्या केली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. घटनेचा तपास सुरू असताना पोलिसांनी 6 आरोपींविरोधात ढोकी पोलिसांत 302 आणि अट्रोस्टी कलमा अनव्य गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण, काँग्रेसमध्ये खळबळ

ही घटना घडून 2 दिवस उलटून गेले आहेत पण तरुणावर अद्याप अंतविधी केला गेला नाही. आरोपींवर अटक करा आणि कठोर शिक्षा करा या मागणीवर नातेवाईक ठाम आहेत. त्यामुळे 2 दिवसांपासून मृतदेहची फरफट सुरू आहे.

मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू, राज्यासाठी हवामान खात्याकडून इशारा

महिले समोर लघवी केल्याचा राग धरून खून केल्याचं पोलीस FIR मध्ये उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार पोलीस हा आरोपींचा शोध घेत आहेत. पण नातेवाई निर्णयावर ठाम असल्यामुळे तरुणाचा मृतदेह असाच पडून आहे. पोलिसांकडून नातेवाईकांना विश्वासात घेण्यात आलं पण तरीदेखील नातेवाईक हट्टावर पेटले असल्याची माहिती हाती येत आहे.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शुल्लक कारणावरून तरुणाची हत्या करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर परिसरात पोलिसांचा धाक नाही का? असा सवालही विचारला जात आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 21, 2020, 10:05 AM IST
Tags:

ताज्या बातम्या