परप्रांतीय विवाहितेचा खून... नवरा बेपत्ता, घराला बाहेरून लावले होते कुलूप

परप्रांतीय विवाहितेचा खून... नवरा बेपत्ता, घराला बाहेरून लावले होते कुलूप

सिन्नरच्या उपनगरात परप्रांतीय विवाहितेचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत महिला मुळची मध्य प्रदेशातील होती.

  • Share this:

नाशिक,21 सप्टेंबर: सिन्नरच्या उपनगरात परप्रांतीय विवाहितेचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत महिला मुळची मध्य प्रदेशातील होती. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.

विवाहितेचा खून केल्यानंतक घराला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. तिचा नवराही बेपत्ता आहे. शाळेत गेलेल्या लहान मुलगी घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला. तिच्या सांगण्यावरून पोलिसांनी घराचे दार तोडून प्रवेश केला. विवाहिता घरात मृतावस्ठेत आढळून आली. सिन्नर पोलिस आणि तपास यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या आहेत. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. मृत महिलेच्या नवऱ्याचाही पोलीस शोध घेत आहेत.

पतीचे होते अनैतिक संबंध.. नागपुरात विवाहितेची आत्महत्या

पतीच्या अनैतिक संबंधामुळे विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. जयश्री विक्रम नारनवरे (वय- 30) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिच्या मृत्यूला तिचा पतीच जबाबदार असल्याची तक्रार जयश्रीच्या आईने नोंदवल्या तक्रारीत म्हटले आहे. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी विक्रम नारनवरेला अटक केली. आरोपी विक्रम नारनवरेचे जयश्रीसोबत 2015 मध्ये लग्न झाले होते. त्याच्याकडे एका मोबाइल कंपनीच्या सीमकार्डची एजन्सी आहे. काही महिन्यांपासून विक्रमचे अनैतिक संबंध असल्याचा संशय जयश्रीला होता. त्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले.

पुण्यात सिलिंडरचा स्फोट; स्फोटाची भीषणता दाखवणारा VIDEO

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2019 04:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...