जेजुरीत पालखी मैदानाजवळ मेहुण्याच्या डोक्यात दांडके घालून खून

जेजुरीत पालखी मैदानाजवळ मेहुण्याच्या डोक्यात दांडके घालून खून

लहान मुलीने मोबाइल खेळताना फेसबुक आणि व्हॉट्सअॅप बंद केल्याने एकाने लाकडी दांडक्याने मुलगी, पत्नी आणि मेहुण्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मेहुण्याचा जागेवर मृत्यू झाला.

  • Share this:

बी.एम.काळे (प्रतिनिधी)

पुरंदर, 22 जुलै- लहान मुलीने मोबाइल खेळताना फेसबुक आणि व्हॉट्सअॅप बंद केल्याने एकाने लाकडी दांडक्याने मुलगी, पत्नी आणि मेहुण्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मेहुण्याचा जागेवर मृत्यू झाला. सोमवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली. अर्जुन शेषराव शिंदे (वय-19, रा. पाथरी, ता. परभणी) मृत तरुणाचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी रवी भास्कर पवार (रा.पाथरी. ता.परभणी) हा फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.

जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रवी पवार, पत्नी लक्ष्मी पवार, मुलगी शिवान्न्या आणि आई-वडील हे कुटुंब (मुळगाव रा.पाथरी .ता.परभणी) संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात फुगे विकण्याचे काम करते. काही दिवसांपूर्वी हे कुटुंब जेजुरी येथील जुन्या पालखी मैदानाजवळ पाल टाकून राहत आहे. रवी पवार याला दारूचे व्यसन असून तो दररोज दारू पिऊन पत्नीला मारहाण करतो. लक्ष्मीने तीन दिवसांपूर्वी तिचा भाऊ अर्जुन शेषराव पवार याला जेजुरी येथे बोलावून घेतले होते. दुपारी तीनच्या सुमारास रवी याची मुलगी शिवान्न्या मोबाइल खेळत होती. तिच्याकडून मोबाइलमधील फेसबुक आणि व्हॉट्अॅप बंद झाले. रवीने शिवान्न्या हिला मार दिला. लक्ष्मी आणि तिचा भाऊ अर्जुन रवीला समजावून सांगत असताना त्याने लाकडी दांडके मारहाण केली. रवीने अर्जुन डोक्यात आणि छातीवर दांडक्यांनी जोरदार वार केली. अर्जुन जमिनीवर कोसळला. लक्ष्मीने रिक्षा बोलावून अर्जुनला ग्रामीण रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अर्जुनची दुचाकी घेऊन रवी फरार झाला आहे.

लक्ष्मी हिने दिलेल्या तक्रारीवरून जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी रवी पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला पकडण्यासाठी पथके रवाना झाली आहेत.

SPECIAL REPORT:दोघांना धडक देऊन समोरून येत होता मृत्यू, दुचाकीवरून उडी मारली म्हणून वाचला जीव!

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 22, 2019 09:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...