News18 Lokmat

धुळ्यात गुंड्याच्या क्रूर हत्येचा व्हिडिओ व्हायरल, मृत्यूनंतरही मानेवर 19 वार

क्रौर्यालाही लाजवेल असा हा हल्ला...धुळ्यातल्या गुड्ड्या उर्फ रफिकउद्दीन शेख या गुंडांची ज्या अमानुष पद्धतीनं हत्या झाली ती पाहता सैतानाच्या अंगावरही शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 20, 2017 10:43 PM IST

धुळ्यात गुंड्याच्या क्रूर हत्येचा व्हिडिओ व्हायरल, मृत्यूनंतरही मानेवर 19 वार

दीपक बोरसे, धुळे

20 जुलै : धुळ्यात  गुड्ड्या शेख या गुंडाची दोनदिवसांपूर्वी भरदिवसा गोळ्या घालून धारधार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आली होची. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज समोर आलंय. हल्लेखोरांनी अक्षरश:  सैतानाच्या अंगावरही शहारे येतील इतक्या क्रूरपणे हत्या केलीये. शेखच्या  मानेवर तब्बल 19 वार करण्यात आले.

क्रौर्यालाही लाजवेल असा हा हल्ला...धुळ्यातल्या गुड्ड्या उर्फ रफिकउद्दीन शेख या गुंडांची ज्या अमानुष पद्धतीनं हत्या झाली ती पाहता सैतानाच्या अंगावरही शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. गुड्ड्या हा पण धुळ्यातला नामचिन गुंड होता. त्याच्यावर एकदोन नव्हे तर पस्तीस गंभीर गुन्ह्यांची नोंद होती.

त्यातही हत्या आणि हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे जास्त होते. गुन्हेगार जेव्हा मोठा झाला त्याचे दुश्मनही तेवढेच मोठे... गुड्ड्या नुकताच जेलमधून सुटून आला होता. तो व्यायाम करून एका चहाच्या टपरीवर चहा प्यायला बसला होता. हाच बेसावध वेळ साधून दहा जणांच्या टोळक्यानं त्याच्यावर हल्ला चढवला.

सुरुवातीला त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. पण गुड्डया पुन्हा उठून हल्ला करेल या भीतीनं तो निपचित पडेपर्यंत त्याच्यावर सत्तुर आणि तलवारीनं वार होत होते. एका हल्लेखोरानं तर त्याच्या मानेवर तब्बल एकोणीस वार केले. शेवटी मेल्याची खात्री झाल्यानंतर हल्लेखोर गुंड पळून गेले.

Loading...

पोलिसांनी गुड्डयाच्या हत्येप्रकरणी दहाजणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पाच पथकं तयार करण्यात आलीयेत. पोलीस शोध घेतायेत. गुड्ड्याला ज्या क्रुरतेनं मारलं त्या क्रौर्याची व्याख्याही करता येणार नाही. त्यामुळे या हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडावं अशी मागणी करण्यात येतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 20, 2017 10:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...