मुंब्रा बायपास आज मध्यरात्रीपासून 2 महिन्यांसाठी बंद, 'हे' आहेत पर्यायी रस्ते

मुंब्रा बायपास आज मध्यरात्रीपासून 2 महिन्यांसाठी बंद, 'हे' आहेत पर्यायी रस्ते

डागडुजी आणि नवीन बांधणीकरता मुंब्रा बायपास आजपासून बंद राहणार आहे. २ महिने हे काम सुरु राहणार असून याआधी १६ एप्रिल २४ एप्रिल पासून मुंब्रा बायपास बंद ठेवण्यात येणार होता.

  • Share this:

07 मे : डागडुजी आणि नवीन बांधणीकरता मुंब्रा बायपास आजपासून बंद राहणार आहे. २ महिने हे काम सुरु राहणार असून याआधी १६ एप्रिल २४ एप्रिल पासून मुंब्रा बायपास बंद ठेवण्यात येणार होता. मात्र मुंब्रा बायपास २ महिन्यांकरता बंद केल्यानंतर जी मोठी वाहतूक कोंडी निर्माण होणारे त्याकरता वाहतूक पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जे एन पी टी यांची पुर्व तयारी झाली नसल्याने हे काम पुढे ढकलण्यात आलं होतं.

पण, आज जिल्हाधिकारी यांनी आजच्या मुहूर्तावर बायपासच्या डागडुजीला मंजूरी दिल्याने सोमवार पासून मुंब्रा बायपासचे काम सुरु होणार असल्याचे जाहीर करण्यात आलं आहे. मात्र यामुळे शिळफाटा ते भिवंडी रस्त्यांवरील कल्याण डोंबिवली शहरातून अवजड वाहतूक होणार असल्याने कल्याण डोंबिवलीकर वाहतूक विभागाच्या या नियोजनावर चांगलेच संतापले आहेत.

मुंब्रा बायपासला पर्यायी रस्ते

- छोट्या वाहनांना मुंब्रा शहरातून प्रवेश

- अवजड वाहनांना मुंब्र्यात प्रवेश नाही

- दूध, भाजीच्या गाड्यांना रात्री 12 ते 5 मुंब्रात प्रवेश

मुंब्रा बायपासला पर्यायी रस्ते

- अवजड वाहनं

- नाशिक, भिवंडी-मुरबाड शहापूरमार्गे वाहतुक

- गुजरातकडे ऐरोली/ मुलूंड टोलनाकामार्गे घोडबंदर

- दुपारी 12 ते 4- रात्री 11ते 5 वाहतूक

 

First published: May 7, 2018, 10:30 AM IST

ताज्या बातम्या