मुंबईत आज दुपारी 4 वाजेपर्यंत तिन्ही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक !

मुंबईत आज दुपारी 4 वाजेपर्यंत तिन्ही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक !

मुंबईत आज तिन्ही लोकल रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे.. दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेच्या तीनही मार्गांवर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात आलाय.

  • Share this:

07 जानेवारी, मुंबई : मुंबईत आज तिन्ही लोकल रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे.. दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेच्या तीनही मार्गांवर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात आलाय. मध्य रेल्वेवर मुलुंड ते मांटुगा स्थानकांदरम्यान अप स्लो मार्गावर, हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दोन्ही स्लो मार्गांवर ब्लॉक घेण्यात आलाय..

- मध्य रेल्वे

मुलुंड-माटुंगा

अप स्लो मार्ग

सकाळी 11:10 ते दुपारी 4:10

या ब्लॉकदरम्यान सर्व स्लो गाड्या फास्ट मार्गांवर वळवण्यात येतील. यामुळे या गाड्या नाहूर, कांजुरमार्ग आणि विद्याविहार या स्थानकांवर थांबणार नाहीत.

- हार्बर रेल्वे

सीएसएमटी-चुनाभट्टी

सीएसएमटी-वांद्रे

डाऊन मार्ग बंद राहणार

सकाळी 11:40 ते दुपारी 4:40

- आजच्या दिवस हार्बर लाईनच्या प्रवाशांना सेंट्रल आणि वेस्टर्न मार्गांवरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आलीये.

- पश्चिम रेल्वे

चर्चगेट-मुंबई सेंट्रल

अप आणि डाऊन स्लो मार्ग

सकाळी 10:35 ते दुपारी 3:35

- चर्चगेट-मुंबई सेंट्रल दरम्यान सर्व स्लो गाड्या फास्ट ट्रॅकवरून धावतील.. त्यामुळे काही स्लो गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 7, 2018 10:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading