मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारामुळे मुंबईकर हैराण, स्मशानातून सतत येतोय धूर

कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारामुळे मुंबईकर हैराण, स्मशानातून सतत येतोय धूर

शिवाजीपार्क इथल्या स्मशानभूमीत दादर आणि परिसरा व्यतिरिक्त लांबूनही रुग्णांचा अंत्यविधी करण्यात येतो आणि त्याचा रहिवाशांना मात्र मोठा त्रास होतो.

मुंबई, 22 जून : राज्यात कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. अशात मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. अशात मुंबईकरांना एक वेगळीच चिंता सतावत आहे. एकीकडे कोरोनाचं गांभीर्य तर दुसरीकडे कोरोना रुग्णांचा अंत्यविधी करताना होणारा धूर आणि त्यामुळे रहिवाश्यांना होणारा त्रास अशा तक्रारींमध्ये आता वाढ झाली आहे. शिवाजीपार्क इथल्या स्मशानभूमीत दादर आणि परिसरा व्यतिरिक्त लांबूनही रुग्णांचा अंत्यविधी करण्यात येतो आणि त्याचा रहिवाशांना मात्र मोठा त्रास होतो. मुंबईत कोरोनामुळे मृतांची संख्याही वाढत आहे. अशात या स्मशानभूमीच्या बाहेर रुग्णवाहिकेच्या रांगा लागलेल्या असतात. याचा त्रास होत असल्याचं अनेकदा सांगूनही प्रशासन ऐकत नसल्यानं आज 22 जून रोजी सकाळी 10.30 वाजता आंदोलन करण्यात आलं. मृतदेह मोठ्या प्रमाणात शिवाजी पार्कात अंतिम संस्कारासाठी आणले जातायत त्याच्या विरोधात आज स्थानिकांनी आंदोलन केलं. भाजपमध्ये डॅमेज कंट्रोल सुरू, येत्या 15 दिवसांत या नावांना मिळणार मोठी जबाबदारी
मुंबईकरांच्या या आंदोलनाला मनसेनेही पाठिंबा दिसा आहे. या राहिवाशांच्या म्हणण्यानुसार, त्यांना धुरामुळे श्वसनाचा त्रास होतो. त्यामुळे इतक्या मोठया संख्येनं इथे अंत्यसंस्कार केले जाऊ नयेत अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, स्थानिक रहिवासी यांनी महानगरपालिका प्रशासना विरोधात मूक निदर्शने केली. या आंदोलनाला मनसेने पाठिंबा दिला. प्रशासनाने यातून मार्ग न काढ़ल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने चीन कंपन्यांना दिला धक्का, 5 हजार कोटींचा प्रकल्प थांबवला संपादन - रेणुका धायबर
First published:

Tags: Corona, Coronavirus, Coronavirus update

पुढील बातम्या