वरळीत केमिकलमुळे लागलेली आग 12 तासानंतर आटोक्यात, अग्निशमन दलाचे 16 जवान जखमी

वरळीत केमिकलमुळे लागलेली आग 12 तासानंतर आटोक्यात, अग्निशमन दलाचे 16 जवान जखमी

मुंबईतील वरळी भागात साधना इमारतीला काल संध्याकाळी पावणे 5 वाजताच्या सुमारास आग लागली होती. ही लागलेली आग रविवारी सकाळी सकाळी सव्वा 4 वाजता म्हणजे जवळपास 12 तासानंतर पूर्णपणे विझवण्यात आली.

  • Share this:

मुंबई, 30 डिसेंबर : मुंबईतील वरळी भागात साधना इमारतीला काल संध्याकाळी पावणे 5 वाजताच्या सुमारास आग लागली होती. ही लागलेली आग रविवारी सकाळी सकाळी सव्वा 4 वाजता म्हणजे जवळपास 12 तासानंतर पूर्णपणे विझवण्यात आली. ही आग इतकी भयानक होती की त्यात 16 अग्निशमन दलाचे जवान आणि आधिकारीचे धुरामुळे जखमी झाले.

जखमी झालेल्या 16 पैकी 6 जवानांना केईएम तर 6 जवानांना पोद्दार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पण सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहेय.

या इमारतीच्या तळमजल्याला ही आग होती. जवळपास 4000 चौरस मीटरच्या या जागेत औषध आणि रसायनांचा साठा होता. ज्यात अल्कली, सोडियम क्लोराईड, सोडियम ऍसिटेट आणि डिझेल जनरेटरमध्ये सुमारे 150 लिटर डिझेल होता. त्यामुळे आग भडकली आणि धुरही पसरला.

शेवटी धुराला वाट करून देण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने भिंत तोडण्यात आली आणि मग आग विझवण्याचा काम करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या या कठोर प्रयत्नानंतर ही आग अखरे थांबवण्यात यश आलं. सुदैवाने या अग्नितांडवात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

VIDEO : डोंबिवलीत छेड काढणाऱ्याच्या बापालाच झोडपलं

 

 

First published: December 30, 2018, 7:42 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading