अत्यावश्यक सेवा वगळता आज मुंबई राहणार बंद, महापालिकेनं केलं आवाहन

अत्यावश्यक सेवा वगळता आज मुंबई राहणार बंद, महापालिकेनं केलं आवाहन

रात्रभर मुंबई-ठाणे, नवी मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचं धुमशान सुरू आहे. मुसळधार पावसाने अख्खी मुंबई पाण्याखाली गेली आहे.

  • Share this:

मुंबई, 23 सप्टेंबर : मुंबईत पावसानं शनिवारी संध्याकाळपासून जोर धरला आणि रात्रभर धुमशान सुरू होतं. जवळपास 180 मिमीहून अधिक पावसाची नोंद पहाटेपर्यंत करण्यात आली असून आता प्रशासनाकडून अलर्ट करण्यात आला आहे. मुंबईत अनेक भागांमध्ये 3 फुटांपर्यंत रस्त्यावर आणि घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे दाणादाण उडाली आहे. रेल्वे स्थानकात रस्त्यांवर पाणीच पाणी असल्यानं वाहतुकीचा पूर्ण खोळंबा झाला आहे.

मुसळधार पावसामुळे आणि एकूण सध्याची परिस्थिती पाहता बृहनमुंबई महापालिकेनं आज नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. अत्यावश्यक सेवा आणि कामं वगळता नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच खासगी कार्यालये आणि इतर कामकाज बंद ठेवण्याचं आवाहन महापालिका आयुक्तांनी केलं आहे.

हवामान खात्यानं मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे याच पार्श्वभूमीवर आज बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे. त्याचबरोबर नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असेही आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री. इक्बाल सिंह चहल यांनी महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

हे वाचा-धो-धो पावसानं अख्खी मुंबई पाण्याखाली, पाण्याचं रौद्र रुप दाखवणारे 16 PHOTOS

रात्रीभर मुंबई-ठाणे, नवी मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचं धुमशान सुरू आहे. शनिवारी संध्याकाळपासून सुरू असलेल्या पावसानं रात्री जोर धरला आणि मुंबईकरांची दाणादाण उडाली. लोकल सेवा पासून रस्त्याच्या वाहतुकीपर्यंत आणि दुकानांपासून ते घरापर्यंत अनेकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सखल भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक खोळंबली तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची झोप उडाली.

मुंबईत दादर-कुर्ला आणि कुर्ला ते मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं लोकलच्या 4 सेवा विस्कळीत झाल्या आहेत. झव्हेरी बाजार परिसरात इलेक्ट्रिक लाईट बंद पडल्या आहेत तर अनेक ठिकाणी दुकांनांमध्ये पाणी शिरलं आहे.रात्रभर मुंबई-ठाणे, नवी मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचं धुमशान सुरू आहे. मुसळधार पावसाने अख्खी मुंबई पाण्याखाली गेली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 23, 2020, 8:34 AM IST
Tags:

ताज्या बातम्या