...नाहीतर हैदराबादसारखी अवस्था होईल, मुंबईतील डॉक्टर महिलेला 2 तरुणांची धमकी

...नाहीतर हैदराबादसारखी अवस्था होईल, मुंबईतील डॉक्टर महिलेला 2 तरुणांची धमकी

बदनामी टाळायची असेलतर एक कोटी रुपये द्या नाहीतर हैदराबादमध्ये डॉक्टर महिलेसोबत झालं तशी तुमची अवस्था होईल' अशा शब्दात अंधेरीतील प्रसिद्ध जिल्ला आयव्हीएफ क्लिनिकच्या महिला डॉक्टरांना धमकवण्यात आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 14 डिसेंबर : 'देशात सध्या डॉक्टरांचे खराब दिवस सुरू आहे. तुमच्या विरोधात एका महिलेने आमच्याकडे तक्रार केली. पण जर बदनामी टाळायची असेलतर एक कोटी रुपये द्या नाहीतर हैदराबादमध्ये डॉक्टर महिलेसोबत झालं तशी तुमची अवस्था होईल' अशा शब्दात अंधेरीतील प्रसिद्ध जिल्ला आयव्हीएफ क्लिनिकच्या महिला डॉक्टरांना धमकवण्यात आलं आहे. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून डॉक्टर महिलेने केलेल्या तक्रारीवरून डी. एन. नगर पोलिसांनी तीन कथित पत्रकारांना गुरुवारी अटक केली आहे.

अंधेरी लिंक रोड चार बाजारात असलेल्या जिल्ला आयव्हीएफ क्लिनिकमध्ये दोन तरुण गेले. तिथे महिला डॉक्टर आणि तिचा फार्मसिस्ट भाऊ काम करत होते. आम्ही  'मुंबई आवाज वेब न्यूज' या वेब पोर्टलमधून आलो आहोत. तुमच्या विरोधात एका महिलेने तक्रार दिली असून आम्ही त्याची बातमी करण्यासाठी आलो आहे. तर ही तक्रार पोलीस आयुक्तांनी आम्हाला दिल्याचंही या दोघांनी महिला डॉक्टर आणि तिच्या भावाला सांगितलं.

इतर बातम्या - राजकारणात पुन्हा खळबळ, शिवसेनेला भाजपची आणखी एक ऑफर

'तुम्हाला जर बदनामी टाळायची असेल तर थोडा खर्च करावा लागेल असं म्हणत दोन्ही तरुणांनी फार्मसिस्ट भावाला घेऊन चार बंगला इथे एका कार्यालात नेलं आणि तिथे एका व्यक्तीची संपादक म्हणून ओळख करून दिली. बदनामी टाळायची असेल तर दोन दिवसात एक कोटी रुपये द्या नाहीतर तुमची बातमी करू. डॉक्टरांचे सध्या वाईट दिवस सुरू आहेत सांभाळून राहा. हैदराबाद इथे काय झालं याची कल्पना आहे ना' अशी धमकी या खोट्या संपादकाने दिली आणि नंतर पुन्हा फार्मसिस्ट मुलाला क्लिनिकमध्ये सोडण्यात आलं.

इतर बातम्या - साईंच्या शिर्डीमध्ये एक-एक करून गायब होतायत लोक, उच्च न्यायालयाचे चौकशीचे आदेश

भावाने घडलेला सर्व प्रकार बहिणीला सांगितला. त्यानंतर त्यांनी थेट डी.एन. नगर पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत  याप्रकरणी अपहरण, खंडणी आणि धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यात पोलिसांनी महेश, चेतन आणि शैलेश या तीन कथित पत्रकारांना अटक केली आहे.

इतर बातम्या - फाशीच्या शिक्षेमुळे डिप्रेशनमध्ये आहेत निर्भयाचे आरोपी, जेवणही घश्याखाली जाईना!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2019 01:29 PM IST

ताज्या बातम्या