आता मुंबई विद्यापीठाचे निकाल 5 ऑगस्टला, कुलसचिवांचा 'माफीनामा'

आता मुंबई विद्यापीठाचे निकाल 5 ऑगस्टला, कुलसचिवांचा 'माफीनामा'

मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल आता ५ ऑगस्टला लागणार आहेत. विद्यापीठाचे कुलसचिव एम. ए. पठाण यांनीच आयबीएन लोकमतला ही माहिती दिलीय. तसेच निकाल जाहीर करण्यास झालेल्या दिरगांईबद्दल कुलसचिवांनी प्रथमच विद्यार्थ्यांची जाहीर माफीही मागितली आहे.

  • Share this:

मुंबई, 31 जुलै : मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल आता ५ ऑगस्टला लागणार आहेत. विद्यापीठाचे कुलसचिव एम. ए. पठाण यांनीच आयबीएन लोकमतला ही माहिती दिलीय. तसेच निकाल जाहीर करण्यास झालेल्या दिरगांईबद्दल कुलसचिवांनी प्रथमच विद्यार्थ्यांची जाहीर माफीही मागितली आहे. राज्यपालांनी निकालासाठी घालून दिलेली ३१ जुलैची डेडलाईन मुंबई विद्यापीठाचं प्रशासन पाळू शकलेलं नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संताप आहे.

मुंबई विदयापीठाच्या आतापर्यंत 153 विभागाचे पेपर तपासून पेपर तपासून झाले असून कॉमर्स आणि कायदा अर्थात 'लॉ'च्या विद्यार्थ्यांची पेपरतपासणी अद्याप बाकी असल्याचं कुलसचिव एम. ए. पठाण यांनी सांगितलं. पुढील शिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांना तातडीने निकाल हवा आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी संबंधीत कॉलेजमध्येच विशेष हेल्प डेस्क बनवण्यात आला आहे. असंही कुलसचिवांनी सांगितलं. तसंच निकालाच्या दिरंगाईबाबत स्वतः कुलगुरू लवकरच पत्रकार परीषद घेऊन सर्व प्रश्नांची उत्तरे देतील, असंही कुलसचिव पठाण यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना सांगितलं.

First published: July 31, 2017, 6:17 PM IST

ताज्या बातम्या