अकरावीची तिसरी यादीही लांबणीवर, विद्यार्थ्यांचे हाल

अकरावीची तिसरी यादीही लांबणीवर, विद्यार्थ्यांचे हाल

दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणावरून अकरावी प्रवेशाचा उडणारा बोजवारा यंदाही सुरूच आहे.

  • Share this:

मुंबई, 26 जुलै : दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणावरून अकरावी प्रवेशाचा उडणारा बोजवारा यंदाही सुरूच आहे. दुसरी यादी लांबणीवर गेल्यानंतर आता तिसरी गुणवत्ता यादीही लांबणीवर पडली आहे. शहरातील अल्पसंख्याक महाविद्यालयांनी त्यांच्या इनहाउस कोट्यातील जागा सरेंडर कराव्यात, असे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिले आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल होणार असून त्यासाठी तिसरी गुणवत्ता यादी लांबणीवर टाकण्याचा निर्णय अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने घेतला आहे. अल्पसंख्याक महाविद्यालयांतील कोट्यातील जागा केंद्रिय प्रवेस फेरीतून वगळल्यानंतर आता पुन्हा न्यायालयाने या महाविद्यालयांतील संस्थांतर्गत कोट्याच्या जागा केंद्रीय फेरीत समाविष्ट करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे तिसऱ्या फेरीमध्ये पुन्हा नवीन बदल होण्याची शक्यता आहे. तर या निर्णयामुळे गुरूवारी अपेक्षित असलेली तिसरी फेरी लांबणीवर जाणार आहे.

नवी मुंबईत जनजीवन सुरळीत पण सुरक्षेसाठी इंटरनेट सेवा बंद

रिक्त जागांची सध्याची स्थिती

केंद्रीय प्रवेश फेरी : 92,933

अल्पसंख्याक कोटा : 58,283

संस्थांतर्गत कोटा : 19,713

इनहाउस कोट्यामध्ये ऑनलाईन प्रक्रियेमुळे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत होते. पण न्यायालयाच्या खंडपीठाच्या आदेशानुसार महाविद्यालयांत गुणवत्तेच्या आधारे प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे यातून विद्यार्थ्यांची चिंता दूर होणार असं म्हणायला हरकत नाही .

हेही वाचा...

पाकिस्तानात सगळ्यात मोठी पार्टी ठरली इम्रान खानची 'तेहरीक-ए-इन्साफ'

मराठा आंदोलनाबाबत राणे आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय घडलं ?

'त्या' पोलिसाच्या पाठीवर बुटाचा ठसा कुणाचा ?, हे आहे सत्य

 

First published: July 26, 2018, 9:31 AM IST

ताज्या बातम्या