मुंबई हादरली! मित्राच्या जुळ्या मुलीला 7व्या मजल्यावरून फेकलं, डायरीत लिहलं होतं...

मुंबई हादरली! मित्राच्या जुळ्या मुलीला 7व्या मजल्यावरून फेकलं, डायरीत लिहलं होतं...

एका व्यक्तीने मित्राच्या तीन वर्षाच्या मुलीला सातव्या मजल्यावरून खाली फेकलं. जेव्हा आरोपी दुसर्‍या मुलीलाही फेकण्यासाठी जात होता तेव्हा लोक घरात घुसले आणि त्याला पकडलं.

  • Share this:

मुंबई, 09 सप्टेंबर : मुंबईच्या कोलाबा परिसरात एक झोप उडवणारी घडना घडली आहे. एका व्यक्तीने मित्राच्या तीन वर्षाच्या मुलीला सातव्या मजल्यावरून खाली फेकलं. जेव्हा आरोपी दुसर्‍या मुलीलाही फेकण्यासाठी जात होता तेव्हा लोक घरात घुसले आणि त्याला पकडलं. या सगळ्या गंभीर प्रकारामुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी व्यक्तीला अटक केली आहे. तर पोलिसांना आरोपीच्या घरातून एक डायरी मिळाली असून त्यातून हत्येचं कारण समोर आलं आहे.

आरोपी आफ्रिकेमध्ये करत होता काम...

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल चुकानी हा शिक्षित आहे. तो आफ्रिकन देश मोरोक्कोमध्ये बर्‍याच वर्षांपासून काम करत होता. अनिलची पत्नी मुंबईत राहायची. अनिलला मुलं नाहीत. तो गेल्या महिन्यापासून भारतात राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिलला मोरोक्कोमधील एका महिलेने सांगितलं होतं की, जर त्याला बाप बनायचं असेल तर त्याने दोन मुलींचा बळी द्यावा लागेल आणि ती दोन्ही जुळ्या मुली असल्या पाहिजेत. मुलांचा बळी दिल्यानंतर तुला मुलंही होतील आणि तुझ्याकडे पुष्कळ पैसेही असेल.

बळीसाठी निवडलं मित्राच्या मुलांना...

आरोपी अनिलने मुंबईत आल्यानंतर आधी जुळ्या मुलींचा शोध सुरू केला. नंतर त्याच्या लक्षात आलं की त्याच्या बालपणीच्या मित्राला दोन जुळ्या मुली आहेत. सप्टेंबरमध्ये आरोपी अनिल मित्राच्या घरी गेला. त्यांच्यासोबत जेवनाता बेत आखला. घरी असताना अनिलने एका मुलीला बेडरूममध्ये ठेवलं आणि दुसर्‍या मुलीला थेट सातव्या मजल्यावरून खाली फेकलं. इमारतीतल्या लोकांच्या हे लक्षात येताच त्यांनी अनिलला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.

इतर बातम्या - हा VIDEO पाहून हृदयाचा ठोका चुकेल, साखरपुडा मोडल्याने तरुणाची इमारतीवरून उडी!

अंधश्रद्धेमुळे गमावला मुलीचा जीव

मोरोक्कोमध्ये एका महिलेने सांगितल्यामुळे मी असं केलं असल्याची कबुली आरोपी अनिलने पोलिसांना दिली आहे. मुलं आणि पैशासाठी त्याने मुलीची हत्या केली. पोलिसांनी आरोपींकडून एक डायरीही जप्त केली आहे. ज्यात प्रत्येक पानावर इंग्रजीमध्ये लिहिलं आहे की, Killed twins to save life...

इतर बातम्या - क्षणात तुटली साता जन्माची गाठ, पतीला उचलण्यासाठी हात देताच डंपरनं चिरडलं!

कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पीआय शिवाजी फडतडे म्हणाले की, आरोपींकडून एक डायरी सापडली असून त्यात दोन लोकांना मारलं असल्याबाबत लिहण्यात आलं आहे. तर या प्रकरणात आम्ही खून आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

इतर बातम्या - मुंबईसह या जिल्ह्यांत 11 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस, काही गावांना पुराचा धोका!

कुटुंबाला धक्का बसला

मुलीने अशा प्रकारे जीव गमावल्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. बालपणाच्या मित्रानेच मुलीला मारलं याची खात्रीच त्यांना होत नाही आहे. अनिल दररोज घरी यायचा आणि आपल्या मुलांबरोबर खेळायचा. त्यानेच असं केल्यामुळे घरच्यांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

SPECIAL REPORT :...म्हणून 4 सूनांनी सासूच्या पार्थिवाला दिला खांदा, ऐकून तुमचेही डोळे पाणावतील!

Published by: Renuka Dhaybar
First published: September 9, 2019, 10:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading