मेट्रो-3 च्या पहिल्या बोगद्याचं भुयारीकरण यशस्वीरित्या पूर्ण

मेट्रो-3 च्या पहिल्या बोगद्याचं भुयारीकरण यशस्वीरित्या पूर्ण

  • Share this:

मुंबई, 24 सप्टेंबर : महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी भुयारी मेट्रो-3 प्रकल्पाचा पहिला टप्पा पार पडलाय. पहिल्या बोगद्याचं भुयारीकरण आज पूर्ण झालंय. मुंबई मेट्रो तीनच्या दीड किलोमीटर्सच्या पहिल्या बोगद्याचं यशस्वी भुयारीकरणानंतर आय़ोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली.

मेट्रो-3च्या पहिल्या बोगद्याचं भुयारीकरण यशस्वीरित्या पूर्ण झालंय. जवळपास दीड किलोमीटरचा हा बोगदा टनेल बोरिंग मशिनच्या सहाय्यानं खोदण्यात आलाय.

8 जानेवारी ते 24 सप्टेंबर म्हणजेच 259 दिवसांनंतर बोगदा खोदण्याचं काम पूर्ण झालंय. मेट्रो-3 च्या निर्मितीतल्या या महत्त्वाच्या टप्प्याचे साक्षीदार होण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मुंबईसाठी प्रस्तावित सिंगल तिकट सिस्टमची घोषणा केली.

दरम्यान, शिवसेनेचा एकही पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित नव्हता. महापौर, नगरसेवक आमदार, खासदार कुणीही या कार्यक्रमाला हजर नव्हता. या अनुपस्थितीचं कारण कळू शकलं नसलं तरी आम्ही महापौरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

===========================================================

VIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...!

First published: September 24, 2018, 11:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading