लोअर परळ स्थानकाबाहेर चेंगराचेंगरी, शेकडो मुंबईकरांचा जीव बचावला!

लोअर परळ स्थानकाबाहेर चेंगराचेंगरी, शेकडो मुंबईकरांचा जीव बचावला!

मुंबईत लोअर परळ रेल्वे स्थानकाबाहेर मोठी चेंगराचेंगरी झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 22 एप्रिल: मुंबईत लोअर परळ रेल्वे स्थानकाबाहेर मोठी चेंगराचेंगरी झाली आहे. ऑफिस सुटल्यानंतर मोठ्या संख्येने प्रवासी रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघाले होते. लोअर परळ स्थानका बाहेरील रेल्वे ब्रिज दुरूस्तीसाठी गेली वर्षभर बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना अरुंद अशा रस्त्यावरून ये जा करावी लागत आहेत. त्यातच या रस्त्यावर मुंबई महापालिकेचा फेरीवाला हटवण्यासाठी मोठा ट्रक आला आणि प्रवाशांची कोंडी झाली.

या अरूंद मार्गावरील कोंडीत अडकलेले प्रवासी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतानाच एका वडापावची गाडीवरील तेलाची कढई पडली. ज्यात एका मुलीचे दोन्ही पाय भाजले. या दूर्देवी घटने नंतर संतप्त प्रवाशांनी बीएमसीच्या ट्रक ड्रायव्हरला मारहाण केलीय. तसेच ट्रकचीही तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तणावपूर्ण परीस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. सध्या परीस्थिती पूर्ववत झालीय. मात्र प्रभादेवी पूल दूर्घटने नंतरही रेल्वे आणि बीएमसी प्रशासन जलद गतीनी दूरूस्तीचे काम पुर्ण करत नसल्यामुळे मुंबईकरांमध्ये संताप व्यक्तं होतोय.


SPECIAL REPORT : राज ठाकरेंना जशास तसे उत्तर, लावा रे तो व्हिडिओ!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 22, 2019 09:15 PM IST

ताज्या बातम्या